सविताभाभी...तू इथंच थांब!! होर्डिंग पाहून पुणेकरांचे थांबले पाय

सविताभाभी...तू इथंच थांब!! होर्डिंग पाहून पुणेकरांचे थांबले पाय

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात चक्क पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या 'सविताभाभी'च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले आहे.

  • Share this:

पुणे, 13 फेब्रुवारी : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. पाट्यातून टोमणे मारणारे पुणेकर काय आयडियाची कल्पना आणतील याचा नेम नाही. अशातच सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात चक्क पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या 'सविताभाभी'च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले आहे.

पुण्यातल्या म्हात्रे पूल आणि नीलायम ब्रिज जवळ लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग्सची शहरभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  या होर्डिंगवर 'सविताभाभी तू इथंच थांब!!' या आशयाचे शब्द या पोस्टरवर आहेत. सविताभाभी तू इथंच थांब म्हटल्याचे होर्डिंग पाहून पुणेकरांचे पाय थांबले आणि हसूही उमटले. परंतु, होर्डिंगवर उल्लेख केलेल्या सविताभाभी नेमक्या कोण? अश्लील कॉमिक कॅरॅक्टर असलेल्या सविताभाभीचा हा संदर्भ आहे का? याबाबत काही कळू शकले नाही.  एकमात्र नक्की येणारे जाणारे मात्र थांबून हे होर्डिंग वाचत आहेत. काही अर्थ लागतो का ते पाहत आहेत आणि काही संदर्भ लागला नाही की रेंगाळून पुढे जात आहेत.

पुण्यात बुचकळ्यात टाकणारे असे होर्डिंग आताच लागले नाही. याआधीही नाटक निर्माते, चित्रपट निर्मात्यांनी बॅनरबाजीची शक्कल लढवली होती.  काही वर्षांपूर्वी 'दादा,एक गुड न्यूज आहे' असे पोस्टर पुण्यात झळकले होते. या पोस्टरमुळेही चांगलाच गदारोळ उडाला होता. एवढंच नाहीतर पोलिसांनी हे पोस्टर हटवलेही होते. पण, दुसऱ्या दिवशी अभिनेत्री प्रिया बापटही हे नाटकाचं पोस्टर असल्याचं जाहीर केलं.  'दादा,एक गुड न्युज आहे'चं  पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आलं. या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे यांच्या भूमिका होती. विशेष म्हणजे, प्रिया बापटने या नाटकाची निर्मिती केली होती.

बरं हा प्रकार इथंच थांबला नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये ‘शिवडे आय एम सॉरी!’ आणि 'सुंदर बायका साडी कुठून खरेदी करतात' या होर्डिंगनीही एकच धमाल उडवली होती.  पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात प्रियकराने  ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले होते. हे बॅनर पाहून पोलीसही चक्रावले. तपासानंतर प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केल्याचे उघड झालं होतं. आता 'सविताभाभी'च्या नावाने पोस्टरबाजी करून नेमका काय हेतू आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

Tags:
First Published: Feb 13, 2020 05:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading