मुंबई, 18 नोव्हेंबर : राहुल गांधी यांनी स्वातत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण चांगलच तापलं आहे. काँग्रेसविरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नाटक करत आहेत. हातात घेतलेला हिरवा झेंडा खाली ठेवण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही. आज असे बोलणार आणि उद्या राहूल गांधींच्या मागे मागे जाऊन सोनिया गांधी यांचे चरणस्पर्श करणार असा घणाघात सोमय्या यांनी केला आहे.
आरोपांना प्रत्युत्तर
दरम्यान दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत नील सोमय्या आणि आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांनाही किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोर्टात खोटी शपथपत्र दिली गेली. बोगस तक्रारदार उभे करण्यात आले. ज्या व्यक्तीने तक्रार दिली तो माणूसच अस्तित्वात नाही. त्याचा फोनही लागत नसल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षाला त्रास दिला त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : ...त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, शेलार पुन्हा आक्रमक, ठाकरे गटावरही हल्लाबोल
मनसे आक्रमक
राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी यांची आज शेगावमध्ये सभा होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी राज्यभरातून शेगावला जावे असे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. अनेकजण शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही मनसैनिकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Kirit Somaiya, Rahul gandhi, Shiv sena, Uddhav Thackeray