मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'नाना काँग्रेसमध्ये पण...', सत्यजीत तांबेंवरून काँग्रेस-राष्ट्रवादीतच जुंपली

'नाना काँग्रेसमध्ये पण...', सत्यजीत तांबेंवरून काँग्रेस-राष्ट्रवादीतच जुंपली

सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपल्याचं चित्र आहे. नाना पटोले यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.

सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपल्याचं चित्र आहे. नाना पटोले यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.

सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपल्याचं चित्र आहे. नाना पटोले यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 फेब्रुवारी : सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपल्याचं चित्र आहे. सत्यजीत तांबे काँग्रेस सोडून जाणार नाही, तो काँग्रेसचा सहयोगी आमदार असेल, कारण त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं, तसंच अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना सबुरीचा सल्लाही दिला.

'आज सकाळी माझं आणि सत्यजीत तांबेंचं बोलणं झालं. त्यांना विनंती केली की तुम्ही तरुण आहात, तुम्हाला पुढचं उज्ज्वल भवितव्य आहे, त्यामुळे शांतपणे आणि बारकाईने विचार करून रणनीती ठरवा. वाटल्यास मंगळवारी, बुधवारी मी मुंबईत आहे, त्यावेळी आपण भेटून बोलू,' असं अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांना सांगितलं.

अजित पवारांच्या या विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट अजित पवारांनाच सुनावलं. सत्यजीत तांबेंबाबतचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. 'अजित पवारांनी आमच्यावर टीका केली. आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर टीका केली. ते महाविकासआघाडीमध्ये आहे, तरीही सांगतात या उमेदवाराला आम्ही मतं दिली. तांबेंच्या घरातलं भांडण होतं, त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवार करत आहेत. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, नाना पटोलेंना सांगितलं, असं ते म्हणतात. उद्धव ठाकरेंचं सरकार पडत होतं, मी सांगितलं होतं, असंही अजित पवार म्हणतात. तुम्हाहा माहिती होतं, तुमच्याकडेच गृहखातं होतं,' अशी टीका नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 'नानाभाऊ पटोले हे काँग्रेसमधील एकमेव असे नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचं काम उघडपणे करत आहेत,' अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Congress, Nana Patole, NCP