कोल्हापुरात नाट्यमय घडामोडी, जयंत पाटलांच्या बैठकीला काँग्रेसचा मोठा नेता अनुपस्थित

कोल्हापुरात नाट्यमय घडामोडी, जयंत पाटलांच्या बैठकीला काँग्रेसचा मोठा नेता अनुपस्थित

एकीकडे युतीच्या प्रचाराला कोल्हापुरातून सुरुवात होत असताना दुसरीकडे आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा

  • Share this:

कोल्हापूर, 24 मार्च : राज्यात युतीच्या प्रचारसभेला कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. एकीकडे युती प्रचाराचा नारळ फोडत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मात्र बिघाडी झाल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीच्या बैठकीला आमदार सतेज पाटील हजर राहणार नसल्याचे समजते.

जयंत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर असून काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. मात्र, काँग्रेस आमदार सतेज पाटील याचवेळी सातारा दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहणार नाही. कोल्हापूरात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील मतभेदाचा फटका आघाडीला बसू शकतो. यासाठीच आमदार सतेज पाटील गटाची नाराजी दूर कऱण्यासाठी जयंत पाटील कोल्हापूरमध्ये पोहचले. पण सतेज पाटील सातारा दौऱ्यावर असल्याने जयंत पाटील कोणाशी चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सतेज पाटील गट नाराज आहे. दरम्यान, महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. तसेच सतेज पाटील जरी दौऱ्यावर गेले असले तरी जयंत पाटील यांची भेट होईल पण ती कुठे होईल सांगता येत नसल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया

First published: March 24, 2019, 12:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading