मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

7/12 उतारा म्हणजे काय? पाहा जुने सातबारा शोधण्याची सोपी पद्धत, Video

7/12 उतारा म्हणजे काय? पाहा जुने सातबारा शोधण्याची सोपी पद्धत, Video

खरेदीपूर्वी जमीन मूळ कोणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल झाले याची योग्य माहिती असावी लागते. उताऱ्यावरून जमीनधारकाकडे किती जमीन आहे याची माहिती मिळते.

खरेदीपूर्वी जमीन मूळ कोणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल झाले याची योग्य माहिती असावी लागते. उताऱ्यावरून जमीनधारकाकडे किती जमीन आहे याची माहिती मिळते.

खरेदीपूर्वी जमीन मूळ कोणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल झाले याची योग्य माहिती असावी लागते. उताऱ्यावरून जमीनधारकाकडे किती जमीन आहे याची माहिती मिळते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 1 ऑक्टोंबर : सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची असल्यास जमिनीचा इतिहास माहीत असणे आवश्‍यक आहे. खरेदीपूर्वी जमीन मूळ कोणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल झाले याची योग्य माहिती असावी लागते. ही माहिती मिळवण्यासाठी सरकारी दस्तऐवज सातबाऱ्याची गरज असते. हे सातबारा म्हणजे काय, तो कसा काढता येतो याबद्दल आज आपण पाहणार आहोत. 

सातबारा म्हणजे काय?

सातबारा उतारा हे दोन शब्द नाहीत तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी जीव की प्राण आहेत. वंशपरंपरेने आलेली एक एकर जमीन असो किंवा स्वतः कष्ट करून घेतलेली जमीन असो या जमिनीची नोंद ही सातबारा उताऱ्यावर केलेली असते. सातबारा उतारा म्हणजे थोडक्यात सांगायचे तर, आपल्या जमिनीवर आपला हक्क सांगणारा सरकारी कागद असतो. 

7 आणि 12 फॉर्ममध्ये वेगवेगळी माहिती 

सातबारा मधील 7 आणि 12 फॉर्ममध्ये वेगवेगळी माहिती असते. फॉर्म 7 मध्ये जमीन मालकाची माहिती आणि फॉर्म 12 मध्ये जमिनीविषयी माहिती असते. या उताऱ्यावरून जमीनधारकाकडे किती जमीन आहे याची माहिती मिळते.

ही कागदपत्रे कुठे मिळतात?

आपल्या कडून जमिनीची जुनी कागद पत्रे हरवून जातात किंवा ती खूप जुनी असल्यामुळे सांभाळून ठेवणे कठीण होऊन जाते. ती खराब होताता. अशा वेळी ते कागदपत्र नव्याने काढण्याची वेळ येते. जर का तुम्हाला कुठल्याही कारणास्तव जुने 7/12 उतारे आणि फेरफार कागद पत्रे हवी असल्यास शासनदरबारी मिळवता येतात. जमिनीची सर्व रेकॉर्ड्स हे शासनाने सांभाळून ठेवलेले असते. भलेही ही कागदपत्रे कितीही जुनी असुद्या, ती वर्षवारनुसार एका क्रमाने शासनाने जपून ठेवलेली असतात.

Video : सौंदर्याचा खजिना 'कास पठार' फुलले, निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदाच खास उपाय

 वेळोवेळी या कागदपत्रांवर औषधांची फवारणी केली जाते. जर तुम्हाला तुमच्या परिवाराकडे पूर्वी किती जमीन होती किंवा जुना 7/12 आणि जुने फेरफार बघायचे असल्यास पाहता येऊ शकतात त्यासाठीचे शुल्क तुम्हाला भरावे लागते..

जुने फेरफार ऑनलाईन उपलब्ध 

महाराष्ट्र शासनाने सर्व जुने 7/12 आणि जुने फेरफार ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहेत. आता तुम्ही जमिनीचे हे जुने रेकॉर्ड्स ऑनलाइन बघू शकाता. जर का काही कारणास्तव तुमचे जुने 7/12 आणि जुने फेरफार पोर्टल वर उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन बारनिशी विभागात कागद पत्रांसाठी अर्ज करू शकता. मात्र, या ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला जुने रेकॉर्डस् मिळायला वेळ लागतो.

 बिगर शेती प्रकरणी (NA) 1950 पासूनचे सातबारे पाहिले जातात. त्यातून त्या जमिनीवर असणारा मालकी हक्क तसेच त्या ठिकाणी लागलेले कूळ कायदा शर्ती जमीन कोणाकडून कशी खरेदी केली हे उल्लेख आढळतो. ते पाहून बिगर शेती प्रकरण केली जातात.

जुने अभिलेख कसे पाहायचे?

 सातबारा काढण्यासाठी सगळ्यात गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 हा पर्याय दिसेल. यावर तुम्ही क्लिक केल्यास 'आपला 7/12' नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर दिसेल. तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही माहिती घेऊ शकता. पण, पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी वेबसाईट ओपन केली असाले, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढण्याची सोय उपलब्ध आहे.

First published:

Tags: Farmer, Satara, Satara news, शेतकरी, सातारा