सातारा 11 नोव्हेंबर : साताऱ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. आप्पा मांढरे या कुख्यात गुन्हेगारावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. 9 तारखेला रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. मांढरे हा साताऱ्यातील राजवाडा परिसरात उभा असताना मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी आप्पा मांढरेवर गोळीबार केला होता. या घटनेत मांढरे याला पोटात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तीघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुचाकीस्वारांचा गोळीबार
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आप्पा मांढरे याचा अनेक गुन्ह्यात सहभाग आहे. मात्र पोलिसांच्या धाकामुळे तो अलिकडच्या काळात शांत झाला होता. 9 तारखेला रात्री सव्वाअकराच्या सुमारास अप्पा मांढरे हा राजवाडा परिसरात उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत अप्पा हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पोटात गोळी लागली होती. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबाराचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
साताऱ्यातील राजवाडा परिसरात गोळीबार; मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी आप्पा मांढरेवर गोळ्या झाडल्या. #Satara #Firing #SataraFiring #news18lokmat #MarathiNews #MaharashtraNews pic.twitter.com/lst8zcoYxE
— News18Lokmat (@News18lokmat) November 11, 2022
तिघांना घेतले ताब्यात
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात तीघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलासह अन्य एकाचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Satara, Satara news, Video, Viral video.