मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजे Vs राजे, शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या आंदोलनावर घेतला संशय, म्हणाले...

राजे Vs राजे, शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या आंदोलनावर घेतला संशय, म्हणाले...


'या आंदोलनामागे काही राजकीय विषय आहे का, राजकीय स्वार्थ आहे का, याची माहिती घेतली पाहिजे

'या आंदोलनामागे काही राजकीय विषय आहे का, राजकीय स्वार्थ आहे का, याची माहिती घेतली पाहिजे

'या आंदोलनामागे काही राजकीय विषय आहे का, राजकीय स्वार्थ आहे का, याची माहिती घेतली पाहिजे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India
  • Published by:  sachin Salve

सातारा, 05 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण आता भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावर उलट भूमिका घेत उदयनराजेंनी हे आंदोलन दिल्लीत जाऊन करावं, असा सल्लावजा टोला लगावला आहे. तसंच, आंदोलनामागे राजकीय स्वार्थ तर नाही ना ? असा संशयही व्यक्त केला.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये मतभेद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे उदयनराजे यांनी नुकतेच रायगडावर आक्रोश सभा घेतली होती. त्यावरून आज शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना खोचक सल्ला दिला आहे.

(कर्नाटकच्या वेशीवर असलेल्या 'त्या' 40 गावांसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा, उदय सामंत म्हणाले...)

उदयनराजे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी वक्तव्य केलं त्यांचा निषेध केला आहे. आम्हाला खात्री आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आता त्यांना विश्वास राहिला नसेल तर मी काही सांगू शकत नाही, असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला.

'या आंदोलनामागे काही राजकीय विषय आहे का, राजकीय स्वार्थ आहे का, याची माहिती घेतली पाहिजे. आंदोलन नक्की करावे, पण विषय कुठे आहे. राज्यपाल जर बदलायचे असेल तर दिल्लीमध्ये आंदोलन करावे लागेल. यासाठी दिल्लीत जावे लागणार आहे. इथं तुम्ही महाराष्ट्रात बसून दंगा करून काय होणारं आहे. दिल्लीत जाऊन आंदोलन करून राज्यपालांना बदलून टाकावे. तुम्हाला कुणी अडवलं आहे, असा सल्लावजा टोलाही शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला आहे.

(जरा तरी लाज ठेवा; प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजीराजे संतापले)

तसंच, त्यांनी कोणती दिशा धरली आहे. ते त्यांना माहिती आहे. मला काही त्याबद्दल माहिती नाही. पण आम्ही जिथे आहे तिथे समाधानी आहोत आणि प्रामाणिक आहे. मागे सुद्धा जिथे होतो तिथे समाधानी होतो. आपलं काही राजकीय साध्य होत नाही म्हणून राजकीय दबाव आणण्याचे काम होत असते आपल्याकडून असं राजकारण झालं नाही. राजकारणामध्ये थोडं थांबण्याची तयारी असली पाहिजे, असा टोलाही शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावला.

First published:

Tags: Marathi news