मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी करणार पर्यावरणाचे रक्षण, प्रात्यक्षिकातून घेणार आनंद

Video : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी करणार पर्यावरणाचे रक्षण, प्रात्यक्षिकातून घेणार आनंद

X
दिवाळीच्या

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी घर परिसरातील प्लॅस्टिक कचरा जमवून त्यापासून पर्यावरण पूरक विटा तयार करणार आहेत.

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी घर परिसरातील प्लॅस्टिक कचरा जमवून त्यापासून पर्यावरण पूरक विटा तयार करणार आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Satara, India

  सातारा, 20 ऑक्टोबर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, प्लॅस्टिक कचऱ्याचा पुर्नवापर करून पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी विद्यार्थ्यांना इको ब्रिक्स (पर्यावरण पूरक विट) बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी घर परिसरातील प्लॅस्टिक कचरा जमवून त्यापासून पर्यावरण पूरक विटा तयार करणार आहेत. या ब्रिक्सपासून शाळेत कंपाऊंड भिंत, बसण्याचे बाके बनवली जाणार आहेत.  

  सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील प्रयास सामाजिक विकास संस्थेच्यावतीने शहर परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना इको ब्रिक्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते आहे. प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलीक मांडवे, डॉ. प्रविण चव्हाण, सदस्य मुन्नाभाई मुल्ला, रोहीत शहा, प्रसाद जगदाळे, अलोक महाजन, आदी सदस्यांनी ही पर्यावरण पूरक विट बनविण्याची मोहीम हाती घेतली आहे.

  Video : ‘त्या’ शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड, माजी सनदी अधिकाऱ्यामुळे मिळाला विमा!

  शहर परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक कचऱ्यापासून पर्यावरण पूरक विट बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सेवागिरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये याबाबतची माहिती व प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच उर्वरित केंब्रीज इंग्लिश मिडीयम स्कूल, शिवाई माध्यमिक विद्यालय, नूतन प्राथमिक शाळा, आदी शाळांमध्येही हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  अशी बनवा इको ब्रिक्स

  प्लॅस्टिक कचऱ्यापासून पर्यावरणाची होणारी हानी त्यापासून होणारे नुकसान, प्लॅस्टिक वापराचे पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना डॉ. मांडवे व सहकारी यांच्याकडून सविस्तरपणे सखोल माहिती दिली जात आहे. विद्यार्थ्यांना ब्रिक्स बनवण्यासाठी नियमित वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्या, चॉकलेट, बिस्कीट पुड्यांचे अच्छादन, आदी प्लॅस्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी सांगितले जाते आहे. 

  Satara : ट्रेकर्सना दिवाळी गिफ्ट! दुर्गप्रेमींचा आवडता किल्ला 'सर' करण्याचा मार्ग मोकळा, Video

  संरक्षक भिंत, बाके बनवली जाणार 

  कचरा रिकाम्या प्लॅस्टिक बाटलीमध्ये टणकपणा येईपर्यंत ठासून भरायचा आहे. ती बाटली पुन्हा झाकणाने बंद करून तिचे रूपांतर पर्यावरण पूरक विटेमध्ये करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनी अशा अधिकाधिक विटा तयार करायच्या आहेत. या तयार विटा शाळेत जमा करायच्या आहेत. या पर्यावरण पूरक विटांपासून नंतर संरक्षक भिंत, बसण्यासाठी बाके तयार केली जाणार असल्याचे प्रयास सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलीक मांडवे यांनी दिली. 

  आम्हाला शाळेमध्ये इको ब्रिक्स पर्यावरण पूरक वीट बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आला आहे. आम्ही दिवाळीच्या सुट्टीत घरामध्ये प्लास्टिकच्या छोट्या पिशव्या तसेच चॉकलेटचे कागद यांच्यापासून वीट बनवणार आहोत व ती शाळेत देणार आहोत असे वडूज येथील विद्यार्थी विशाल पाटीलने सांगितले.

  First published:

  Tags: Diwali, Satara, Satara news, दिवाळी, सातारा