मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : उच्चशिक्षित तरुणानं सुरू केलं गावाच्या नावानं हॉटेल, झणझणीत मिसळीसाठी होतीय गर्दी

Satara : उच्चशिक्षित तरुणानं सुरू केलं गावाच्या नावानं हॉटेल, झणझणीत मिसळीसाठी होतीय गर्दी

फार्मासिस्ट असलेला चैतन्य घोरपडे यांनी आपला मेडिकल व्यवसायास बगल देत स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 23 नोव्हेंबर : मिसळ पाव हे महाराष्ट्रातील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. मिसळ खाण्यास खूपच मजेदार आणि चविष्ट असते. आता मिसळ ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात देखील मिळू लागली आहे. तुम्ही मिसळ पाव सकाळच्या स्नॅक्सपासून ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता. तुम्ही जर झणझणीत तर्रीबाज मिसळ खाण्याचा शोधात असाल तर  साताऱ्यातील  टाकवाडीची मिसळं फेमस आहे. 

धनगर समाजाच्या गावाच्या नावावरून, त्या गावातील संस्कृतीवरून साताऱ्यातील या मिसळ सेंटरचे नाव टाकवाडी मिसळ सेंटरचे असे ठेवण्यात आले आहे. सातारा-पंढरपूर महामार्गावर गोंदवले जवळच टाकवाडी मिसळ म्हणून हे हॉटेल आता फेमस झाले आहे. एका तरुण उद्योजकाने हा व्यवसाय सुरू केला आहे. फार्मासिस्ट असलेला चैतन्य घोरपडे यांनी आपला मेडिकल व्यवसायास बगल देत स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

टाकेवाडी गावात धनगर समाजाची मोठी यात्रा भरते. या ठिकाणी तिखट मटणाचा रस्सा खास असतो. अशाच तर्रीदार रस्सा आणि धनगरी समाजाचे पारंपारिक पद्धतीचं घरगुती झणझणीत तिखट यापासून खमंग अशी मिसळ या हॉटेलात दिली जाते. येथील मिसळ खाण्यासाठी खवय्ये गर्दी करतात. खवय्यांचा प्रतिसाद पाहता गेल्या एका वर्षात आणखी दोन शाखा सुरू झाल्या आहेत. मिसळ मधील रस्सा हा झणकेबाज असतो, ही येथील मिसळीची खासियत आहे. या ठिकाणी युवा पिढी सोबत वयस्कर नागरिक देखील मोठी गर्दी करतात. यासाठी लागणार मसाला तसेच इतर उत्पादन हे स्वतः घरगुती तयार करून वापरतात.

संघर्षाला सलाम! उकळत्या तेलातील वडे हातानं काढणाऱ्या महिलेचं 'हे' आहे सत्य

टाकवाडी मिसळ कुपन सिस्टीम

दिवाळीत शहरातील काही कापड दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील खरेदीवर ऑफर म्हणून येथील मिसळचे कुपन दिले होते. या अनोख्या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. सातारा पंढरपूर महामार्गाजवळ गोंदवले गावापासून 3 किलोमीटरवर अंतरावर हे मिसळ सेंटर आहे. म्हसवड शहरालगत देखील या मिसळ सेंटरची शाखा आहे.

First published:

Tags: Local18, Local18 food, Satara