मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : पोवाडे, लेझीम, आणि शिवरायांचा जयघोषानं दुमदुमला प्रतापगड!

Video : पोवाडे, लेझीम, आणि शिवरायांचा जयघोषानं दुमदुमला प्रतापगड!

X
किल्ले

किल्ले प्रतापगडावर तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

किल्ले प्रतापगडावर तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • Local18
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 01 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याला बोलावून यमसदनी धाडले आणि आदिलशाहीवरती वचक बसवला, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ही गाथा दरवर्षी किल्ले प्रतापगडावर जागवली जाते. यंदा गडावरील अफजलखानाच्या कबरी जवळचे अतिक्रमण प्रशासनानं हटवले आहे. अनेक वर्ष शिवप्रेमींची मागणी होती ती यंदाच्या वर्षी पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदा शिवप्रताप दिन कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.

किल्ले प्रतापगडावर तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रथमच राज्य सरकारने सर्व शिवभक्तांना उपस्थितीत राहण्याची मुभा दिली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पहिला मिळाले. या वर्षीच्या शिवप्रताप दिनाचे वेगळे आकर्षण करण्यात आले होते. पूर्वसंध्येला गडावर लेझर शोचे आयोजन करण्यात आले. या लेझर शो माध्यमातून शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहायला मिळाले. अफजल खानाच्या वधाचा इतिहास उलघडताना पाहून शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटले.

Osmanabad : ऐतिहासिक वारसा आणि दारूगोळ्याचे भंडार असलेला परांडा किल्ला

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगडावर जय्यत तयारी करण्यात आली होती. अवघ्या प्रतापगडाला फुले व भगव्या झेंड्यांनी सुशोभित करण्यात आलं होते. असंख्य शिवप्रेमी ढोल-ताशांच्या गजरात प्रतापगडावर दाखल होऊन ढोल ताश्यांनी किल्ला दणाणून निघालेला पाहिला मिळाला. शिवरायांची प्रतिकृती असलेली पालखी देवीच्या मंदिरातून अश्वरुढ असलेल्या गडावरच्या शिवरायांच्या पुतळ्यापाशी आणली गेली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य बुरुजावर भव्य अशा जरीकाठी भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले.

खानाच्या कबरीजवळ सुरक्षा 

शिवप्रतापदिनी असंख्य शिवप्रेमी प्रतापगडावर जमा झाले होते. या पार्श्वभूमीवर अफजल खानाच्या कबरीजवळ पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. या उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपरिक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलीस मानवंदना देण्यात आली. त्यामुळे अवघा प्रतापगड शिवमय झाला होता.

First published:

Tags: Local18, Satara