सातारा, 04 फेब्रुवारी : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. तर वरळी मतदासंघात मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याआधी पाटण मतदारसंघात उभं राहुन निवडणूक लढवून दाखवा, असं प्रति आव्हान मंत्री शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी जोरदार पलवार केला आहे.
(...म्हणून कसबा पोटनिवडणुकीत टिळकांच्या कुटुंबांना उमेदवार नाकारली, पाटील यांचा खुलासा)
'स्वत:ला आमदार होण्यासाठी वरळीतल्या दोन आमदारांचं तिकीट कापून विधानपरिषदेची आमदारकी द्यावी लागली. एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी त्यांना दोन आमदारकी द्यावी लागली ही ज्यांची वस्तुस्थिती आहे आणि यांनी एकनाथ शिंदेंना आव्हाण देणं हे हास्यास्पद आहे, असं सांगत शंभूराजे देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
आदित्य ठाकरे गेले ६ महिने काहीच बोलत नव्हते. मात्र आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बोलायला लागले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतून उभं राहण्याचं आव्हान दिलंय मात्र माझं आदित्य ठाकरे यांनीच माझ्या पाटण मतदारसंघात उभं राहुन दाखवावं असं आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं.
(चिंचवडमध्ये भाजपने दिला वहिणींना मान, भावाला उमेदवारी नाकारली!)
तसंच, उद्धव ठाकरे यांना कोणता अनुभव होता, ते कधी आमदार झाले होते, कधी मंत्री होते का? त्यांना प्रशासनाचा कोणता अनुभव होता म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं. पृथ्वीराज चव्हाण हे किमान खासदार होते त्यांना प्रशासनाचा अनुभव तरी होता, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या याही बाजूवर बोलावं असा खोचक टोला शंभुराजेंनी लगावला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.