मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : माणदेशी माणसांची अनोखी परंपरा, मेंढरांची हटके तोरण स्पर्धा, पाहा VIDEO

Satara : माणदेशी माणसांची अनोखी परंपरा, मेंढरांची हटके तोरण स्पर्धा, पाहा VIDEO

साताऱ्यात आगळी वेगळी अशी मेंढरांची तोरण स्पर्धा भरण्यात येते. पंचकृषीतील मेंढपाळ विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देऊन मेंढ्यांना स्पर्धेसाठी सज्ज करतात.

साताऱ्यात आगळी वेगळी अशी मेंढरांची तोरण स्पर्धा भरण्यात येते. पंचकृषीतील मेंढपाळ विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देऊन मेंढ्यांना स्पर्धेसाठी सज्ज करतात.

साताऱ्यात आगळी वेगळी अशी मेंढरांची तोरण स्पर्धा भरण्यात येते. पंचकृषीतील मेंढपाळ विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देऊन मेंढ्यांना स्पर्धेसाठी सज्ज करतात.

सातारा, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रात खेळ, व्यायाम व मनोरंजन यांची प्रदीर्घ परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. गैलगाडा शर्यत, घोड्यांची शर्यत आपण पाहिल्याच आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यात आगळी वेगळी अशी मेंढरांची तोरण स्पर्धा भरण्यात येते. पंचकृषीतील मेंढपाळ विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देऊन मेंढ्यांना स्पर्धेसाठी सज्ज करतात. काय आहे ही अनोखी स्पर्धा पाहूयात या रिपोर्टमधून.., सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी पट्यात माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यातील काही भाग येतो. या ठिकाणी पशुपालन व शेती मुख्य व्यवसाय आहे. या भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात मेंढी पालन करतो. मेंढीपालनासाठी सहा महिने कोकण पट्ट्यात तसेच वायदेशात  वाई, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा येथे मेंढ्या चारण्यासाठी जातो. या भागात एक आगळी वेगळी मेंढरांची तोरण स्पर्धा आयोजित केली जाते. 15 ते 25 हजारापर्यंतची बक्षीसे ही स्पर्धा माणदेशातमाण, खटाव, आटपाडी, सांगली येथे आयोजित केली जाते. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत मेंढपाळ मोठ्या प्रमाणात सहभाग देखील घेतात. स्पर्धेसाठी मेंढ्यांना विशिष्ट प्रकारणे प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. यात उंच उडीचे मारण्याचे प्रशिक्षण असते. स्पर्धेमध्ये दोन बांबूंच्या सहाय्याने नारळाचे तोरण दहा ते बारा फूट उंचीवरती बांधले जाते. ते तोरण स्पर्श करणाऱ्या मेंढ्याला 15 ते 25 हजारापर्यंतची बक्षीस दिले जाते. Video : शेतकऱ्यांच्या कामात घोणस अळीचा अडथळा, विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय ढोल, पिपाणी, सनईच्या तालात स्पर्धा या स्पर्धामध्ये विशिष्ट असे वाद्य देखील वाजवली जातात. ढोल, पिपाणी, सनईच्या तालात स्पर्धा पार पडते. ज्यावेळी मेंढा तोरण मारण्यासाठी पळवला जातो. त्यावेळी वेगळ्या प्रकारे ढोल वाजवला जातो. या ढोलाच्या तालावरती मेंढा धावत असतो. तोरणा जवळ गेल्यावरती उंच उडी मारून तोरण स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तर काही मेंढ्याना छत्रीच्या साह्याने भीती दाखवली जाते आणि तो जोरात उंची उडी घेऊन तोरण स्पर्श करतो. ही स्पर्धा सातारच्या पूर्व दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या माणदेशात भरवल्या जातात.
First published:

पुढील बातम्या