मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : पोलीस अधिकाऱ्याला एक चूक भोवली अन् पुन्हा बनला हवालदार!

Satara : पोलीस अधिकाऱ्याला एक चूक भोवली अन् पुन्हा बनला हवालदार!

साताऱ्यातील पोलीस अधिकारी विजय शिर्के यांची 2 वर्षासाठी पदानवती करून त्यांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे.

साताऱ्यातील पोलीस अधिकारी विजय शिर्के यांची 2 वर्षासाठी पदानवती करून त्यांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे.

साताऱ्यातील पोलीस अधिकारी विजय शिर्के यांची 2 वर्षासाठी पदानवती करून त्यांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 1 ऑक्टोबर : लाच प्रकरणी अनेक कारवाया करण्यात येतात. तसेच शिक्षा देखील सुनावली जाते. मात्र, पैसे मागितल्या प्रकरणी 2 वर्षासाठी पदावनती केल्याचे प्रकरण साताऱ्यात घडले आहे. साताऱ्यातील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या केस प्रकरणात पैसे मागून त्रास दिल्या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के यांची 2 वर्षासाठी पदानवती करून त्यांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे. या घटनेमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

साताऱ्यातील उद्योजक राजेंद्र चोरगे यांच्या गुरुकुल शाळेच्या मालकी हक्कावरून 4 वर्षांपूर्वी वाद झाला होता. यातून राजेंद्र चोरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी आणि केसमध्ये मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के यांनी पैसे मागितले होते. या सर्व बाबी तक्रारदार राजेंद्र चोरगे यांनी रेकॉर्डिंग केल्या. हे सर्व पुरावे पोलीस अधीक्षकांकडे सादर केले. आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी राजेंद्र चोरगे यांनी केली होती. याप्रकरणी पोलीस खात्याअंतर्गत चौकशी झाल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांची पदावनती करण्यात आली आहे.

मुलं चोरणारा समजून शेकडो लोकांनी त्याला घेरलं अन्.., ठाण्यातील धक्कादायक घटनेचा Video

6 लाख घेतल्याचे रेकॉर्डिंगमध्ये कबूल

सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के यांच्यावर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली आहे. 12 लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 6 लाख घेतल्याचे पोलिसाने रेकॉर्डिंगमध्ये कबूल केलं आहे.

या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी तक्रारदार असणारे राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.

First published:

Tags: Crime, Police, Satara, Satara news, पोलीस, सातारा