सातारा, 26 जानेवारी : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आला असून, विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर अनेक जण या विषयावर बोलण्याचं टाळत असल्याचं दिसून येतय. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं रोहित पवार यांनी?
पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छूक लवकरच..; विखे पाटलांचा मोठा दावा
पडळकरांना टोला
तसंच पार्थ पवार हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचं भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पडळकर यांना टोला लगावला आहे. पार्थ पवार हे नाराज नाहीत, गोपीचंद पडळकरांनी आधी स्वत:चा मतदारसंघ सांभाळावा मग बारामती ताब्यात घेण्याचा विचार करावा असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis, NCP, Rohit pawar, Sharad Pawar