मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : आता ॲपमधूनच होणार विहीर, बोअरवेलची नोंदणी, पाहा काय आहे पद्धत VIDEO

Satara : आता ॲपमधूनच होणार विहीर, बोअरवेलची नोंदणी, पाहा काय आहे पद्धत VIDEO

ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होणार आहेत.

ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होणार आहेत.

ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 1 ऑक्टोंबर :  शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे ठरत आहे. याचसोबत आता या ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होणार आहेत. 

ना लेखी अर्ज, ना शुक्ल

ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकरी आपल्या शेतातूनच बोअरवेल, विहीर, झाडे यांची नोंद करू शकणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कोणताही लेखी अर्ज, तसेच शुक्ल भरण्याची गरज नाही. अगदी मोफत आणि विशेष म्हणजे शेतातूनच ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ई-पीक पाहणी ॲपमधून राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. 

Video : सौंदर्याचा खजिना 'कास पठार' फुलले, निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदाच खास उपाय

शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी तसेच क्षेत्रातील माहिती भरताना पिकाचा फोटो, विहीर बोअरवेल फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

विहीर, बोअरवेल नोंदणी 

ॲप ओपन केल्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचा आहे. खाते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 'कायमपड' असा ऑप्शन येईल, तो निवडून त्यामध्ये खालच्या भागांमध्ये विहीर, बोअरवेल सिलेक्ट करायचे आहे. विहीर, बोअरवेलचे फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. यामध्ये आपल्याला अनेक ऑप्शन पाहायला मिळतात. ज्याची नोंद करायची तो पर्याय आपण निवडू शकता. 

7/12 उतारा म्हणजे काय? पाहा जुने सातबारा शोधण्याची सोपी पद्धत, Video

ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या माहिती बाबत व इतर नोंदीबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांनी केलेली ई- पीक पाहणी, किंवा विहिरीची नोंदीला स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंद होणार आहे.

24 तासांमध्ये दुरुस्तीही

पिकांसंदर्भात तसेच इतर विहिरी, बोअरवेल याची माहिती भरताना शेतकऱ्यांकडून अनेकवेळा चुकाही होतात. मात्र, चुकलेली माहिती दुरुस्त करण्याची एक संधी असणार आहे. मात्र, दुसऱ्यांदा माहिती भरताना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे.

असे करा अ‍ॅप डाउनलोड

मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी अ‍ॅप 2.0 व्हर्जन डाउनलोड करावे. खालील लिंक वरून अ‍ॅप डाउनलोड करता येईल. https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova&hl=en_IN&gl=US शेतकऱ्यांनी अ‍ॅपच्या साहाय्याने पिकाची, विहिरीची, झाडांची अचूक माहिती भरावी, पिकांची माहिती भरताना त्यात चूक झाल्यास पीक विमा व इतर सुविधांपासून शेतकरी वंचित राहू शकतात. 

First published:

Tags: Farmer, Satara, Satara news