मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साताऱ्यातील खूनाला वेगळं वळण; पोलीस पत्नीनेच काढला पतीचा काटा; तपासात धक्कादायक खुलासा

साताऱ्यातील खूनाला वेगळं वळण; पोलीस पत्नीनेच काढला पतीचा काटा; तपासात धक्कादायक खुलासा

पोलीस पत्नीनेच काढला पतीचा काटा

पोलीस पत्नीनेच काढला पतीचा काटा

सातऱ्यात गोळ्या झाडून अमित भोसले यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात आता वेगळी माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सचिन जाधव, प्रतिनिधी

सातारा, 4 फेब्रुवारी : सातारा शहरात 24 जानेवारीच्या रात्री दीडच्या सुमारास वाढेफाटा परिसरात अमित भोसले याचा 4 गोळ्या झाडुन खुन करण्यात आला होता. या घटनेनंतर सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी याकडे गाभीर्याने लक्षं घालत 10 पोलीस पथकं शोधासाठी पाठवली होती. खुन ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी खुप अंधार होता. त्यामुळं कोणताच सबळ पुरावा उपलब्ध नव्हता. यामुळं तपासात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

पत्नीनेच काढला काटा

मात्र, एसपी समीर शेख यांनी पोलीस दलातील खास डिटेक्शन मधील अनुभवी अधिकाऱ्यांना काही सुचना देवुन त्यांच्यावर जबाबदारी सोपवत तपासाची चक्र फिरवली. राज्यातील सुमारे 7 जिल्हे पोलीस पथकांनी पालथे घातल्यानंतर सीडीआर गोपनीय माहिती तसंच विश्लेषणाच्या आधारे मार्ग काढत सातारा पोलीसांनी अखेर 5 आरोपींना गोव्यातुन अटक केली. यातील धक्कादायक बाब म्हणजे या खुनाची सुपारी मयत अमित भोसले याच्याच पत्नीनं दिली असल्याचं तपासात निष्पंन्न झाल.

वाचा - तरुणीने आखला स्वत:च्याच हत्येचा कट, कारण समोर येताच पोलिसांनाही बसला धक्का

यातील काही आरोपी पुण्यातील असुन बाकी आरोपी साताऱ्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. यात एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दिली. पत्नीला मयत अमित भोसले सतत त्रास देत होता. सतत भांडणं होत होती आणि त्याचे बाहेर अनैतिक संबंध होते. याच कारणातुन मयत अमित भोसले याच्या पत्नीने त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपीनं दिल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.

कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, वाढे फाट्याच्या एका टपरीजवळ गाडीत बसून नाष्टा केल्यानंतर हात धुवत असताना दोन हल्लेखोरांनी अमित भोसले यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. अमित याच्यावर हल्लेखोरांनी एकूण चार गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चार गोळ्या झाडल्या गेल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमित भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. अमित भोसले यांचा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे.

First published:

Tags: Satara