मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पॅड लावून रोहित पवार उतरले मैदानात, जोरदार बॅटींग, MCA वर निवड योग्यच असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न

पॅड लावून रोहित पवार उतरले मैदानात, जोरदार बॅटींग, MCA वर निवड योग्यच असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न

आमदार रोहित पवार

आमदार रोहित पवार

आमदार रोहीत पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यात आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 26 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. यानंतर आज साताऱ्यात रोहित पवार हे जोरदार बॅटिंग करताना पाहायला मिळाले.

रोहित पवारांची जोरदार बॅटिंग -

आमदार रोहीत पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केएसडी शानबाग विद्यालयाला भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी विद्यालयातील मुलांचा सत्कार केला. तसेच सत्कारानंतर त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यात आला. या आग्रहामुळे रोहित पवारांनी आपली बॅटींग किती भारी आहे हे दाखवुन दिलं. प्रत्येक बॉलवर जोरदार फटका मारत त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर झालेली निवड कशी योग्य आहे, हेच यातुन दाखवुन देत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर पडळकरांनी केली होती टीका -

रोहित पवारांच्या या निवडीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला होता. 'पवार कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी कुस्ती खेळली? अजितदादा कबड्डीचे अध्यक्ष त्यांनी कबड्डी खेळली का? सुप्रिया सुळे खो-खो अध्यक्ष होत्या, त्या कधी खेळल्या का? रोहित पवार क्रिकेटचा अध्यक्ष, त्याला क्रिकेट खेळता येतं का? रोहित पवारला एक मॅच खेळायला लावा, 5-10 रन केले तर, ठेवा,' असा प्रहार पडळकर यांनी केला होता.

हेही वाचा - जन्मापासून पायच बनलेत 'हात'! नंदुरबारच्या 8 वर्षीय गणेशला हवा मदतीचा हात!

दरम्यान, आज सातारा दौऱ्यावर असताना रोहित पवारांनी आपली बॅटींग किती भारी आहे हे दाखवुन दिलं. प्रत्येक बॉलवर जोरदार फटका मारत त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर झालेली निवड कशी योग्य आहे, हेच यातुन दाखवुन देत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

First published:

Tags: Maharashtra politics, Mla, NCP, Rohit pawar, Satara