सातारा, 24 मार्च : पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर आता खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना चांगलाच समाचार घेतला आहे. एवढंच नाही तर मी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झालं तर मिशा आणि भुवया काढून टाकेल असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं उदयनराजे यांनी?
उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन भ्रष्टाचार कुठे केला याचा पुरावा द्यावा. लोकांसमोर अथवा गांधी मैदानात मी येण्यास तयार आहे. माझा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर मी माझ्या मिशा आणि भुवया काढून टाकेन असं आव्हान खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना दिलं आहे.
हिरेंवर ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी? उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर जारी
तुमचं कार्य एवढंच मोठं होत तर तुमच्या घरातली व्यक्ती सामान्य माणसाच्या विरोधात का निवडून येऊ शकली नाही असा टोलाही उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना लगावला आहे. आता उदयनराजे यांना शिवेंद्रराजे काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.