सातारा, 28 मार्च : जिथं गौतमी पाटीलचा डान्स शो तिथं राडा किंवा गोंधळ होणार हे काही आता नवीन राहिलेलं नाही. गौतमी पाटीलच्या डान्सबद्दल अनेक मतमतांतर आहेत. अनेकांना तिची नृत्याची शैली अश्लिल वाटते, तर अनेकजणं तिची पाठराखण करीत स्वातंत्र्याचं कारण देतात. आतापर्यंत बायकोच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम ठेवल्याचं आपण पाहिलं आहे. आता तर साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटील थिरकताना दिसली आणि सुरू झाली चर्चा. याचे व्हिड़ीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
यानंतर मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आधीच सातारा तालुक्यासह जावली तालुक्यात कार्यक्रमांचे आयोजन केले जात आबे. जावली तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कुडाळ येथील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
'शेतकरी जगला तर तुम्ही जगाल', अवकाळीवरून संभाजीराजे संतापले; कृषीमंत्र्यांना सुनावले
या कार्यक्रमादरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्टेजवर नाचण्याची विनंती केली असता काही वेळासाठी आमदार शिवेंद्रराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर हात वर करून थिरकलेले पाहायला मिळाले.
View this post on Instagram
या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला साडी चोळी देऊन आमदार शिवेंद्रराजे यांनी सन्मान केला. कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा पोलिसांनी चांगला समाचार घेऊन सौम्य लाठी चार्ज देखील केलेला पाहायला मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautami Patil, Mla, Satara