मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara : लॉकडाऊनमध्ये शोधली शिक्षणाची आयडिया, ग्रामीण भागातील शिक्षकाला आंतरराष्ट्रीय सन्मान

Satara : लॉकडाऊनमध्ये शोधली शिक्षणाची आयडिया, ग्रामीण भागातील शिक्षकाला आंतरराष्ट्रीय सन्मान

zilla Parishad school vijayanagar student

zilla Parishad school vijayanagar student

जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Satara, India

  सातारा, 20 जानेवारी : टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील  शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थाने घेतली आहे.

  बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी करोना टाळेबंदीतही मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही. त्यांच्या शाळेत 40 विद्यार्थी शिकतात. आईवडिलांकडे स्मार्टफोन नसल्याने जाधव यांनी दूरसंवादाच्या (कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले.

  मुलांना सहज आकलन होण्यासाठी त्यांनी या गोष्टींचा वापर केला. मोठ्या मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला. जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली.जाधव सरांच्या अभिनव कार्यासाठी त्यांना 24 डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह ॲवॉर्डस पुरस्कारा जाहीर झाला. त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला.

  मनपा शाळेतील विद्यार्थ्याची कमाल, फ्रेंच भाषेच्या परीक्षेत देशात 11 वा! Video

  प्रयोगशीलतेसाठी पुरस्कार

  हनीबी नेटवर्क व गियान या दोन संस्थांनी शिक्षणातील प्रयोगशीलता, नवप्रवर्तन यासाठी हा पुरस्कार ठेवला होता. त्यात पारंपरिक ज्ञान पद्धतीतील रोजचे अडथळे दूर करणाऱ्या शिक्षकांचा विचार करण्यात आला. एकूण 87 देशांतून 2500 प्रवेशिका आल्या होत्या. त्यात 9 देशांतील 11जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. 

  जागतिक स्तरावर कौतुक 

  आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची राज्य, राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाल्याचा आनंद आहे. या पुढील काळात आणखी शिक्षकांना अशा व्यासपीठांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून जगभरात होत असलेले नावीन्यपूर्ण शिक्षणाचे प्रयोग आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचतील आणि शिक्षकांच्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील असे शिक्षक बालाजी जाधव यांनी सांगितले. 

  First published:

  Tags: Education, Local18, Satara, School