पुणे, 20 जानेवारी : राज्यात या वर्षाच्या सुरूवातीपासून थंडी पडल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोर वाढला होता. दरम्यान पुढच्या पाच दिवसांत हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचे लोट कमी होत असल्याने राज्यातील तापमान 2 ते 3 अंशांनी उतरणार असल्याची माहिती देण्यात आली.
हवामान विभागाकडून यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांत कडाक्याची थंडी पडली होती. दरम्यान ही थंडी कमी होण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
हे ही वाचा : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर वाढणार, अलर्ट जारी
राज्यातील काही भागात दिवसभर 30 अंशांच्या पुढे तापमान असते तर रात्री अचानक थंडी पडते. याचबरोबर पहाटेच्या वेळी धुके आणि थंडी पडत असल्याने लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पुढच्या 5 दिवसांत सरासरी किमान तापमानात सुमारे 2-3 अंशांनी वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्यास सुरुवात होईल.
निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात उन्हाच्या झळा जाणवरणार आहेत.
देशाच्या उत्तरेत मागच्या 10 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे 3 दिवसांच्या अंतराने सध्या उत्तर भारतात कधी पाऊस, बर्फ, धुके, थंडी पडत आहे. 19 ते 26 जानेवारीपर्यंत याचा परिणाम उत्तर भारतात जाणवण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : 13 वा हप्ता कधी येणार, तुम्हाला लाभ मिळणार की नाही लगेच चेक करा
दरम्यान राज्यात उत्तरेतील थंडीचा परिणाम काही प्रमाणात जाणवला नसला तरी हवेत गारवा वाढला होता. सध्या महाराष्ट्रात जमिनीपासून हवेच्या अधिक उंच उच्च दाबामुळे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहणार्या प्रत्यावर्ती चक्रीय वार्यामुळे उत्तरेकडून आपल्याकडे झेपावणार्या थंडीला तयार होणारा रोध, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी अजूनही जाणवू देत नाही. अर्थात, कडाक्याची आवर्तने यापुढेही येऊ शकतात, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Mumbai, Pune, Weather, Weather update, Weather warnings