मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : 'शुभ मंगल' करताना 'सावधान', लग्न जमवणाऱ्या फसव्या टोळ्या सक्रिय

Satara : 'शुभ मंगल' करताना 'सावधान', लग्न जमवणाऱ्या फसव्या टोळ्या सक्रिय

 2 लाख रुपये घेऊन लग्न लावून देण्यात आले होते. रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर नवरीने अंगावरील दागिन्यांसह पलायन केले.

2 लाख रुपये घेऊन लग्न लावून देण्यात आले होते. रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर नवरीने अंगावरील दागिन्यांसह पलायन केले.

2 लाख रुपये घेऊन लग्न लावून देण्यात आले होते. रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर नवरीने अंगावरील दागिन्यांसह पलायन केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 26 सप्टेंबर : लग्नाने विश्वासाच्या नात्यातून दोन परिवार एकत्र येतात. आयुष्याच्या रेशीम गाठी बांधल्या जातात. पती-पत्नीच्या संसाराची सुरुवात होते. मात्र, विश्वासघात करून लग्न होताच नवरी मुलगी फरार होत असल्याच्या घटनांनी सातारा हादरले आहे. असे प्रकार सातारा जिल्ह्यात घडत असून यातून लाखो रुपयांची लूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दागिन्यांसह नवरीचे पलायन

खटाव तालुक्यात एका लग्नासाठी 2 लाख रुपये घेऊन लग्न लावून देण्यात आले. लग्न होताच मुलीचे नातेवाईक निघून गेले. त्यानंतर नवरदेव-नवरीसहआनंदाने घरी परतला. मात्र, रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर नवरीसोबत आलेली महिला व नवरीने अंगावरील दागिन्यांसह पलायन केले. शेवटी नवरदेव व घरच्या मंडळींनी शोधा शोध केली. मात्र, कोणीच सापडलं नाही. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यस्थाची मदतीने लग्न जुळले

माण तालुक्यातील मार्डी गावातील घटना देखील अशीच आहे. मुलाचे लग्न जमविण्यासाठी लातूर येथील एका मध्यस्थाची मदत घेण्यात आली. मध्यस्थाने मुलीचे स्थळ आणले. मुलगी पाहुण्यातील आहे असे मुलांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. मुलाला मुलगी पसंत पडली. लग्नाची बोलणी होऊन लग्नही ठरले. मुलींच्या वडिलांना मुलांच्या कुटुंबीयांनी 1 लाख 60 हजार रुपये देण्याचे ठरले.

घरी गेली ती माघारी आलीच नाही

ठरल्याप्रमाणे गावाजवळील देवीच्या मंदिरात दुपारी दीडच्या सुमारास विवाहसोहळा साध्या पद्धतीने पार पडला. दोन्ही कडली मिळून 15 ते 20 नातेवाईक लग्नाला उपस्थित होते. लग्न होताच 1 लाख 60 हजार रुपये घेऊन ते नातेवाईक निघून गेले. नवरदेव नवरीसह आनंदाने घरी आला. मात्र, सात दिवसांनी मुलगी स्वतःच्या घरी गेली ती माघारी आलीच नाही. मुलगी का येत नाही हे पाहण्यासाठी मुलांकडून काहीजण गेले असता तिथे कोणीच राहत नसल्याचे समोर आले. एखाद्या चित्रपटाच्या कथानकात घडवा असा हा प्रकार आहे. त्यामुळे नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला. 

गर्ल्स हॉस्टेलमधील व्हायरल MMS प्रकरणात धक्कादायक अपडेट; मास्टरमाईंड निघाला लष्करातला!

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाल्याने, लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही दलालांनी तर लग्नाळू नवर्‍या मुलाच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपये घेऊन मुलींचे लग्न लावून देण्याचे आणि नंतर नवरीला फरार करण्याचे उद्योगही सुरू केले आहेत. जिल्ह्यात विशेषतः खटाव, सातारा, माण, कोरेगाव या तालुक्यात यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी काही टोळ्यांना यापूर्वी अटकही केलेली आहे.

आयटीआय कॉलेजमध्ये भयानक प्रकार, वॉशरूममध्ये कपडे बदलणाऱ्या मुलीचा व्हिडिओ काढला अन्

नागरिकांनी खबरदारी घ्यावी 

लग्नात मुलीच्या कुटुंबीयांकडून हुंडा घेणे गुन्हा आहे. तसेच, मुलीच्या वडिलांना पैसे देऊन मुलीचे लग्न करून आणणे हाही गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टी करू नयेत. मुलामुलींचे लग्न अनोळखी व्यक्तीच्या मध्यस्थीने जुळवू नयेत. मुलींचे फसवे लग्न लावून देणार्‍या अनेक टोळ्या सध्या सक्रिय असल्याने सर्वांनी खबरदारी घेत आपली संभाव्य फसवणूक टाळावी, असे आवाहन निर्भया पथकाच्या नीलम रासकर यांनी केले. 

First published:

Tags: Crime, Marriage, Satara, Satara news