मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara : दिवाळीसाठी गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट, पाहा Video

Satara : दिवाळीसाठी गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट, पाहा Video

X
श्री

श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरात देखील दिवाळी साजरी होत आहे.

श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरात देखील दिवाळी साजरी होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

    सातारा, 25 ऑक्टोबर : दिवाळीला सुरुवात झाली आहे. आनंदोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात श्री क्षेत्र गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिरात देखील दिवाळी साजरी होत आहे. दीपावलीनिमित्त महाराजांचे मंदिर फुलांनी सजवले आहे.

    सातारा जिल्ह्याच्या पूर्वेला माण नदीवरती सातारा-पंढरपूर मार्गावर सातार्‍यापासून 70 किमी अंतरावर गोंदवले हे गाव आहे. यालाच रामदेव संस्थान असे संबोधतात. नामपूजेचा व अन्नदानाचा महिमा सांगणारे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म व समाधी स्थान येथे आहे. गोंदवलेकर महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाची वाट दाखवली. नामोपसणेचा मार्ग दाखविला आणि अन्नदानाचा महिमा सांगितला.

    मंदिराच्या गाभार्‍यातील तळमजल्यामध्ये महाराजांची समाधी आहे. पायर्‍या उतरून तिचे दर्शन घ्यावे लागते. मंदिर अतिशय सुंदर आहे. समाधीवर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिराच्या सभागृहात भजन, प्रवचनाचे नित्य कार्यक्रम असतात. मंदिराच्या पश्चिमेला चार मोठे हॉल असून तेथे भक्तांना महाप्रसाद दिला जातो. हॉलच्या पश्चिमेला पाच ते सहा उंच व अवाढव्य अशा इमारती आहेत तेथे भक्त निवासाची सोय केली जाते. 

    बस सेवा उपलब्ध

    गोंदवले हे गाव माण तालुक्यात सातारा- पंढरपूर रस्त्यावर सातारा पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा तसेच खाजगी वाहने आपणास भेटू शकतात. 

    Video : आई की बायको कोणाच्या हातचा आवडतो फराळ?, अभिनेता संदीप पाठक म्हणतो…

    आरती वेळ व प्रसाद 

    पहाटे मंदिरात काकडा आरती असते. यावेळी मंदिरात भाविकांना बसण्याची सोय करण्यात येत. तसेच दुपारी 12 वाजता एक आरती व रात्री आठ वाजता आरती होते.

    भक्तांसाठी अनेक सुविधा

    मंदिरात सकाळी सहा वाजता चहा, नाष्टा तसेच दुपारी 12.30 वाजता जेवणाची व्यवस्था केली जाते. रात्री साडे आठ वाजता देखील जेवणाची सोय केली जाते. या ठिकाणी रोज 3 ते पाच हजार भाविक येतात. प्रशासनाने या ठिकाणी राहण्याची सोय सर्व भाविकांना करून दिली आहे. सहा ते सात मोठ्या इमारती मध्ये राहण्याची सोय केलेली आहे. तसेच येथे मोफत हॉस्पिटल देखील उपलब्ध आहे.

    First published:

    Tags: Diwali, Satara, Satara news, दिवाळी