सचिन जाधव, प्रतिनिधी
सातारा, 20 मार्च : साताऱ्यामध्ये गोळीबाराची घटना ताजी असताना एकाच रुममध्ये 2 तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कोरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सी मधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी राहत्या रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास झाल्याने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(थोडासा वाद अन् पत्नीसह चिमुरड्यासोबत धक्कादायक कांड, मग स्वतःही उचललं भयानक पाऊल)
यामध्ये एकाने पेटवून घेतले तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोघांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोरेगाव पोलीस दाखल झाले आहेत. दोन्ही तरुणाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातूनच मित्रानेच मित्रावर गोळीबार
दरम्यान, पाटण तालुक्यातील गुरेघर येथे रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून मदन कदम याने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. मदन कदम यांनी स्वत:चे मित्र श्रीरंग जाधव यांच्यावर गोळीबार करुन सोबत असलेल्या काँन्ट्रक्टर सतीश सावंत यांच्यावर सुद्धा गोळीबार केला तसंच या गोळीबारात मृत श्रीरंग जाधव यांचा भाऊ प्रकाश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. मदन कदम हा पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील आहे. तो ठाणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक सुद्धा राहिला आहे. श्रीरंग लक्ष्मण जाधव आणि सतीश बाळासाहेब सावंत हे कोरडेवाडी पाटण तालुक्यातील आहेत.
(शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गट भिडले, वैजापूरमध्ये लॉज मालकासह एकाला बेदम मारहाण)
पवनचक्कीचा जुना वाद मिटवण्याची चर्चा मदन कदम याच्या फार्महाऊसवर सुरू असताना पुन्हा वादावादी झाली आणि त्यातच रागाच्या भरात मदन कदम याने गोळीबार केला सुमारे अर्धा तास हा गोळीबार सुरू होता त्यामुळे याठिकाणी कोणीच व्यक्ती घाबरुन मदतीसाठी जावू शकली नाही. या घटनेनंतर पाटण तालुक्यात तणाव आहे. मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोरडेवाडी गावात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.