मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : पावसानं तारलं पण अळीनं मारलं! शेतकऱ्यांच्या त्रासात रोज नवी भर

Satara : पावसानं तारलं पण अळीनं मारलं! शेतकऱ्यांच्या त्रासात रोज नवी भर

पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हाताशी आलेले पिक हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हाताशी आलेले पिक हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हाताशी आलेले पिक हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 29 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागात यंदा निसर्गाने शेतकऱ्यांची चांगलीच साथ दिली. सुरुवातीला कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी धूळ वाफेवर पेरण्या केल्या. नंतर सतत झालेल्या दमदार पावसाने शिवारात डौलदार पिके डोलू लागली आहेत. मात्र, अचानक संकट आले आणि पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अळी उभे पिकं फस्त करीत आहे. हाताशी आलेले पिक हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदा दुष्काळी भागात सर्वात जास्त बाजरी पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे. पिके जोमात आली आहेत. मात्र, मागील काही दिवसात पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. बाजरी, उडीद, मूग आणि मका पिकांवर अळीने हल्ला चढवला असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा लष्करी अळ्या मुळे भंग होत आहे.

महागडी औषधही निष्प्रभ

शेतकऱ्यांनी उडीद, मूग आणि मका पिकांवरील रोग कमी करण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र, अळीसमोर महागडी औषध देखील निष्प्रभ ठरत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर दोन तीन वेळा फवारणी केली मात्र अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने पिके सोडून देण्याची वेळ आली आहे.

भूसंपादन न करताच महामार्ग तयार, जमिनीचा मोबदला कधी मिळणार? Video

हातचे पीक गेले

यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर पिके बहरली आहेत. सध्या मका पिकांतील तण काढणे, कोळपणे कामे सुरू आहेत. पण सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी केलेला खर्च, खते, मशागत, पेरणी आणि बियाणे एवढे करूनही हातचे पीक गमावून बसण्याची वेळ आल्याने शेतकरी खचले आहेत.

Video : सौंदर्याचा खजिना 'कास पठार' फुलले, निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदाच खास उपाय

मदतीचं आवाहन

मागील काही दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बाजरीची पिके भुईसपाट झाले होती. त्याचे पंचनामे होत आहेत तोच नवीन संकट उभे राहिले आहे. काही जणांची बाजरीची पिके चांगले आली. मात्र, इतर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव असल्याने पीके वाया जाण्याची वेळ आली आहे. शासनाने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

First published:

Tags: Farmer, Satara, Satara news