मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : जन्मदात्या बापानंच मुलाला साखळीनं डांबले, आड माळरानात भोगल्या नरकयातना

Video : जन्मदात्या बापानंच मुलाला साखळीनं डांबले, आड माळरानात भोगल्या नरकयातना

X
गेल्या

गेल्या दीड वर्षापासून मुलाला साखळीने त्याच्या पायाला कुलूप लावून डांबून ठेवले होते. ना वेळेवर अन्न पाणी अशा परिस्थितीत हा मुलगा यातना भोगत होता.

गेल्या दीड वर्षापासून मुलाला साखळीने त्याच्या पायाला कुलूप लावून डांबून ठेवले होते. ना वेळेवर अन्न पाणी अशा परिस्थितीत हा मुलगा यातना भोगत होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

    सातारा, 5 नोव्हेंबर : जन्मदात्या बापाने मुलाला घरातून बाहेर काढून आड माळरानावर एका झोपडीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दीड वर्षापासून मुलाला साखळीने त्याच्या पायाला कुलूप लावून डांबून ठेवले होते. ऊन, वारा, पाऊस, ना उजेड, ना वेळेवर अन्न पाणी अशा परिस्थितीत हा मुलगा यातना भोगत होता.  

    मुलाला साखळीने डांबून ठेवल्याची घटना सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले येथील आहे. तरुणाचे वय 22 वर्षीय असून हा तरुण मनोरुग्ण आहे. जन्मदात्या बापाने या तरुणाला घरातून बाहेर काढून आड माळरानावर एका झोपडीत गेल्या दीड वर्षापासून साखळीने डांबून ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केला व पोलिसांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली.

    अंधाऱ्या झोपडीत,  कुलूप लावून डांबले

    लाईटची कोणतीही सोय त्या ठिकाणी करण्यात आली नव्हती. झोपडी सुद्धा गळकीच. झोपणे, उठणे, बसणे एकाच ठिकाणी असल्याने त्याच दुर्गंधीत गेल्या काही दिवसांपासून या मनोरुग्णाला त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्याला कित्येक दिवस अंघोळ नसल्याने त्वचेवर पुरळ आले होते. तसेच केस ही खराब झाले होते. या अवस्थेत तो यातना भोगत होता.

    मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले होते

    मनोरुग्ण तरुणाचे रामचंद्र रमेश शिंदे असे नाव आहे. हा तरुण वेडसरपणात गावात फिरत असे. त्याचा स्वतःच्या मेंदूवर कोणताही ताबा नसल्याने त्याचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले गेले होते अशा परिस्थितीत तो गावातील हॉटेल, किराणा दुकान, बाजारातील भाजी पाल्याचे व्यापारी तसेच स्थानिक ग्रामस्थांना त्रास देत होता. लोक जे देतील ते खायचा. ऊन, वारा पावसात म्हसवड ते सातारा राज्यमहामार्ग व गावातील काही रस्त्यावर फिरून मिळेल, त्या ठिकाणी झोपण्याचा, राहण्याचा. 

    आई-वडिलांनीच काढला आपल्या एकुलत्या एक मुलाचा काटा; त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

    झोपडीला काटेरी कुंपण 

    रामचंद्र सतत आपल्याच धुंदीत कुठलेही भान नसल्याने सैरभैरपणे फिरत होता. पण कुटुंबाला व ग्रामस्थांना त्याचा त्रास अधिक वाढल्याने जन्मदात्या बापाने त्याला  गावापासून तीन किलोमीटर अंतरावर स्वतःच्या शेतात एका झोपडीत साखळीने पायाला कुलूप लावून बांधून ठेवले. ठेवलेल्या झोपडीच्या अवतीभवती काटेरी झाडाच्या फांद्यांनी कुंपण केले.

     मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार

    गावकऱ्यांनी दहिवडी पोलिसांना संपर्क साधत सदर तरुणाबाबत माहिती दिली. याची तत्काळ दखल घेऊन मनोरुग्णाला ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छ अंघोळ घालून नवीन कपडे घालून 108 ॲम्बुलन्समधून सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. या तरुणाला पुढे पुणे येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. 

    First published:

    Tags: Local18, Satara, Satara news, सातारा