लहान वयातच एव्हरेस्टवर स्वारी : 'जगातलं सर्वोच्च शिखर फक्त ३ तासांवर होतं आणि....'

लहान वयातच एव्हरेस्टवर स्वारी : 'जगातलं सर्वोच्च शिखर फक्त ३ तासांवर होतं आणि....'

वयाच्या विसाव्या वर्षी उत्तुंग एव्हरेस्टला गवसणी घालणाऱ्या प्रियांका मोहितेच्या जिद्दीची कहाणी...

  • Share this:

मनाली पवार

मुंबई, 27 नोव्हेंबर : "फक्त तीन तासांवर जगातलं सर्वोच्च शिखर दिसत होतं. एव्हरेस्ट सर करण्यासाठी माझ्यासोबत असलेल्या शेर्पाची तब्येत बिघडली. पहिल्याच प्रयत्नात शिखराच्या जवळ येऊन माघारी फिरण्याचा निर्णय माझ्यासारख्या मुलीसाठी थोडा कठीणच होता. मी जिद्दीनं चढाई सुरू ठेवली आणि काही तासांतच माझं स्वप्न पूर्ण झालं...." अवघ्या विसाव्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या प्रियांकाचे थरारक अनुभव ऐकून आणि पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

प्रियांका मोहिते मूळची साताऱ्याची. तिनं लहान वयातच हे शिखर सर करण्याचा विक्रम केलाय. सातवीत असताना सहजच तिला ट्रेकिंगचा छंद लागला. मग त्याचा ध्सास घेतला आणि जिद्दीनं तिचा ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला. आज एवढ्या तरुण वयात माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती केवळ तिसरी भारतीय ठरली आहे.

एव्हरेस्ट सर करतानाच्या अखेरच्या टप्प्यातल्या अडचणींविषयी सांगताना प्रियांका म्हणते, शेवटच्या टप्प्यातलं आव्हान वेगळंच असतं. प्रतिकूल वातावरणात चढाई असते आणि सगळी अनिश्चितता असते. अशा वेळी  'ते शिखर तिथेच राहणार आहे. तू पुन्हा त्यावर चढाई करू शकतेस. त्यामुळे योग्य निर्णय घे...' ही तीन वाक्यं कानात घोंगावत होती.

तीन वर्षं सतत ट्रेकिंग केल्यानंतर प्रियांकानं आपली वाट गिर्यारोहणाकडे वळवली. प्रियांकाने राजगड-तोरणा, शिवथर घळ असे लाँग ट्रेल्स करण्यास सुरुवात केली. बारावीनंतर तिनं गंगोत्री ग्लेशिअरमध्ये 17 हजार फूट उंची गाठली होती. यानंतर तिने अॅडव्हान्स कोर्स पूर्ण केला आणि पुढे तांत्रिकदृष्ट्या बऱ्यापैकी कठीण असलेलं उत्तराखंड मधले माउंट बंदरपूंछ शिखरही पहिल्यांदाच सर केलं.

विविध अडचणी पार करत 22 मे 2015 ला एव्हरेस्टचा माथा गाठला. तरुण वयात माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती तिसरी भारतीय ठरली. याशिवाय प्रियांकानं 2018 मध्ये माउंट ल्होत्से सर करण्याची संधी मिळाली आणि तिथेही तिनं भारताचा झेंडा फडकावला. हा खडतर प्रवास करताना आर्थिक, मानसिक, शारीरिक अडचणींना देखील ती सामोरी गेली.

हिमालयातील प्रत्येक मोहीम 25 ते 60 दिवसांची असते. माउंट एव्हरेस्ट आणि माउंट ल्होत्से नंतर 2019 ला सर्वाधिक पाचव्या उंचीचं 'मकालू' आणि 2020 साली तिसऱ्या सर्वाधिक उंचीच्या 'कांचनगंगा' शिखराला गवसणी घालायची आहे.

सचिन तेंडुलकरनंही प्रियांकाला भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

First published: November 28, 2018, 7:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading