मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खड्ड्यामुळे साताऱ्याच्या महिला रायडरची बाईक घसरली अन् टँकरचे चाक गेले डोक्यावरून, उदयनराजेंनी दाखवला होता हिरवा झेंडा

खड्ड्यामुळे साताऱ्याच्या महिला रायडरची बाईक घसरली अन् टँकरचे चाक गेले डोक्यावरून, उदयनराजेंनी दाखवला होता हिरवा झेंडा

एका खड्यातून बाईक नेताना शुभांगी पवार घसरून पडल्या. तितक्यात मागून येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले.

एका खड्यातून बाईक नेताना शुभांगी पवार घसरून पडल्या. तितक्यात मागून येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले.

एका खड्यातून बाईक नेताना शुभांगी पवार घसरून पडल्या. तितक्यात मागून येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले.

नांदेड, 12 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे (sadeteen shaktipeeth) दर्शन घेण्यासाठी निघालेल्या एका 32 वर्षीय महिला रायडरला (Womens Bike Rider) अपघातात मृत्यू झाला आहे. बाईकवरून पडल्यानंतर टँकरचे चाक डोक्यावरून गेले त्यामुळे या महिला रायडरचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी संभाजी पवार (shubhangi pawar) (वय 32) असं मृत महिला रायडरचे नाव आहे.  सातारा (satara) येथील हिरकणी बाईक रायडर्स महिला ग्रुप हा शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाला होता. साताऱ्याहुन नऊ महिला बाईकवर निघाल्या होत्या. या महिलांच्या टीमला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. राज्यातील ठीक ठिकाणच्या देवीचे दर्शन घेत या महिला माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात होत्या.

Bigg Boss च्या घरात असं काय झालं ज्यामुळे सुरेखाताई चिडल्या अन् तडकाफडकी...,

हा ग्रुप नांदेडमधील अर्धापुर येथे पोहचला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. एका खड्यातून बाईक नेताना शुभांगी पवार घसरून पडल्या. तितक्यात मागून येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित आठ महिला सुखरूप आहेत.

दरम्यान,  जिल्हा प्रशासनाने मृतदेह आणि महिलांना साताऱ्याला पाठवायची व्यवस्था केली आहे. या ग्रुप मधील महिला विविध विभागात अधिकारी असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.

हिरकणी रायडर्स सातारा या संस्थेमार्फत 10 ऑक्टोबर रोजी साताऱ्यातून सुरुवात केलेल्या साडे तीन शक्तीपिठाच्या दर्शन यात्रेच्या राईडवर असताना सातारा शहरातील योगा टीचर शुभांगी संभाजी पवार यांचे अपघाती निधन झाल्याचे समजले. त्याच्या कुटुंबीयांच्या व मित्रपरिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना, अशी भावना उदयनराजेंनी व्यक्त केली.

नादुरुस्त कारला धक्का मारणाऱ्या 3 तरूणांना अज्ञात ट्रकने चिरडले

दरम्यान, कोंढाळी नागपूर येथील चार तरुण नागपूर येथून अमरावती येथे अंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. अमरावती येथून नागपूरला परत येत असताना त्यांची कार सातनवरी शिवारात नादुरुस्त झाली. नादुरुस्त कारला मागून धक्का मारत असतांना या तरूणांना अज्ञात ट्रकने धडक दिली.

Cibil Score चांगला असेल तर त्वरित मिळेल कर्ज, फॉलो करा या 6 महत्त्वाच्या Tips

या अपघातात एक तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले तर एकाला किरकोळ मार लागला आहे. आकाश अडसुले असं मृतकांचे नाव आहे.  रविवारी हे चार मित्र नागपूर येथून कारने अमरावतीला अंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. परत येत असताना ही घटना घडली. यात सुमीत नागदेवे, अश्विन वाकोळीकर, आकाश जगन्नाथ वाकोळीकर हे जखमी झाले आहे. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकांविरुद्ध अपघातांचा गुन्हा नोंदवीला असून फरार ट्रक चालकांचा शोध घेत आहे.

First published:

Tags: सातारा