सातारा, 11 जानेवारी : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या गव्याचं आता साताऱ्यातही दर्शन झालं आहे. मात्र हा गवा नंतर साताऱ्यातील महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरातील एका विहिरीत पडल्याची घटना घडली.
महाबळेश्वर -पाचगणी रस्ता क्रॉस करत असताना एका गाडीला हा गवा धडकला आणि भीतीपोटी जवळ असलेल्या विहिरीत त्याने उडी मारली. ही घटना रविवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली असून अनेक तासापासून गव्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करण्यात येत होते.
घटनास्थळी सह्याद्री ट्रेकर्सचे जवान आणि वनविभागाची एक टीम या बचावकार्यात सक्रिय झाली होती. गव्याचे वजन जास्त असल्याने आणि विहिरीवर लोखंडी पोल असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. मात्र तरीही बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
दरम्यान, पुण्यासारख्या शहरी भागात दिसून आल्याने गवा हा प्राण राज्यभर चर्चेत आहे. पुणे शहरात अलिकडच्या काही दिवसांत गव्याचं दोन वेळा दर्शन झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.