सातारा, 16 सप्टेंबर : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. नवी दिल्लीत शनिवारी (14 सप्टेंबर)हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या हजेरीत राजेंचा प्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण पंतप्रधान मोदी व्यासपीठावर कोठेच दिसले नाहीत. मोदींच्या अनुपस्थितीची बरीच चर्चा झाली. पण या सर्व चर्चांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम देत यामागील खरं कारण सांगितलं आहे. साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे. राजकीय प्रवेशाच्या कार्यक्रमांना पंतप्रधान कधीही उपस्थित राहत नाहीत. यासंदर्भात तसा प्रोटोकॉल आहे. या कारणामुळेच पंतप्रधान मोदी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला हजर राहू शकले नाहीत. पण यानंतर स्वतः मोदींनी राजेंना भेटायलाही बोलावलं आहे. ही भेट न झाल्यास 19 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार आहेत. येथे पंतप्रधान मोदी आणि उदयनराजेंची भेट होईल.'
Day 20 Interacting with media on #MahaJanadeshYatra in Karad #महाजनादेशयात्रा https://t.co/chHe04ZEmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2019
(वाचा :...शिस्तीचे वळण राजांना लागतंय, अभिनंदन! उद्धव ठाकरेंच्या टपल्या आणि टिचक्या)
तुम्ही कलम370च्या बाजूनं कि विरोधात?
राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कलम 370 रद्द करण्याच्या समर्थनार्थ मतदान करता आलं असतं, पण त्यांनी केलं नाही. कलम 370 च्या बाजूनं आहात की विरोधात? हे आधी शरद पवारांनी स्पष्ट करावं. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर पाकिस्तानसंदर्भात केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडलं. लोकशाही धोक्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगू नये. शरद पवारांनी मताचं राजकारण करू नये, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
Apologies and Big Thank you to Karad!
Despite being late by 4.30 hours, you showed your firm commitment and support to development !!!#MahaJanadeshYatra pic.twitter.com/OJC88loYNC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 15, 2019
(वाचा : ...शिस्तीचे वळण राजांना लागतंय, अभिनंदन! उद्धव ठाकरेंच्या टपल्या आणि टिचक्या)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील देखील उपस्थित होते. 'देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 15 वर्षांपासूनची प्रलंबित कामे मार्गी लागली. राष्ट्रवादी पक्षात अडवा व जिरवा धोरण राबवलं गेलं. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरामागे हेच कारण आहे',अशी प्रतिक्रिया उदयनराज यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर दिली. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
(पाहा : VIDEO: भाजपची फसलेली ऑफर! पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला किस्सा)
VIDEO: म्हाडा कोकण मंडळाची 100 घरांची लवकरच सोडत; इतर टॉप 18 बातम्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा