Home /News /maharashtra /

शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या अजिंक्यतारा गडावर सुरू आहे धक्कादायक प्रकार

शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या अजिंक्यतारा गडावर सुरू आहे धक्कादायक प्रकार

अजिंक्यतारा किल्ल्यावर लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे.

सातारा, 11 डिसेंबर : छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारा आणि सातारा नगरीला घडवणारे छत्रपती शाहू महाराजांनी ज्या गडावरून गोर गरीब उपेक्षितांना न्याय देत मराठ्यांचं साम्राज्य उभ केलं त्या अजिंक्यतारा किल्ल्यावर लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. या किल्ल्याला आज अंधश्रध्देत लोटण्याचं काम काही मंडळींकडून सुरू झालं आहे. अजिंक्यतारा गडावर गेल्यावर आजही छत्रपतींच्या कार्यकालातील इतिहास सांगणाऱ्या खाना-खुना शाबुत आहेत. अनेक वट वृक्षही शाबुत आहेत. झाडा-छुडपाने संपूर्ण परिसर व्यापला आहे. मात्र याच परिसरातील शांततेचा भंग करण्याचं काम काही समाजकंटकांनी सुरू केलं आहे. काही झाडांवर बकऱ्याचं कातडं लटकत आहे तर काही झाडांच्या खाली नैवैद्याचा सडा...हळद –कुंकु, लिंबू...असं बरच काही दिसत आहे.. अमावस्येच्या रात्री 12 वाजल्यानंतर तर अंगावर काटा आणणारा प्रकार या परिसरात सुरू होतो. या परिसरातील झाडांवर खिळे ठोकून बाहुल्याही लटकवण्यात आल्या आहेत. स्वच्छ हवेचा आनंद घेणासाठी येणाऱ्या सातारकर नागरिकांच्या हे लक्षात आले आणि हळू हळू सर्वत्र याची चर्चा सुरू झाली. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्तेही मग या परिसरात पोहचले. त्यांनी सर्व साहित्यांचा पंचनामा केला. अफजल खानाच्या वधानंतर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे भोसले, ताराराणी यांच्या वास्तव्यानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. त्यानंतर पुन्हा तो ताराराणींनी जिंकून घेतला. त्या नंतर शाहू महाराजांनी याच किल्यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण केलं. तसंच शिवाय त्यांनी सातारा ही नगरीही वसवली. मात्र आता याच नगरीत भक्कमपणे उभा असललेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अघोरी प्रकार करण्यात येत आहे. या अघोरी प्रकाराबाबत आता अंनिसकडून सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Satara, Satara (City/Town/Village)

पुढील बातम्या