Home /News /maharashtra /

गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण प्रकरण, माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण प्रकरण, माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

साताऱ्यात महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला पोलिसांनी अटक केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच आरोपीने केलेल्या कृत्याप्रकरणी संतापही व्यक्त केला आहे.

मुंबई, 20 जानेवारी : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील (Satara district) एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Video viral in Social media) झाला आणि एकच खळबळ उडाली. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे की, गावचा माजी सरपंच असलेला व्यक्ती एका महिला वनरक्षकाला बेदम मारहाण (lady forest guard beaten) करत आहे. या कृत्यात या माजी सरपंचाला त्याच्या पत्नीनेही मदत केली. या व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आणि या सरपंचावर टीकेचा भडीमार सुरू झाला. या प्रकरणात आरोपीला आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Lady forest guard beaten video goes viral, Satara police arrest former sarpanch) आदित्य ठाकरेंचं ट्विट या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, आरोपीला आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. गरोदर महिला वनरक्षकला मारहाण मिळालेल्या माहितीनुसार, पीडित वनरक्षक महिला ही तीन महिन्यांची गर्भवती आहे. गर्भवती महिलेच्या पोटातही आरोपीने लाथा मारल्या असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्या महिलेच्या डोक्यात दगड देखील मारला. या हल्ल्यात महिला वनरक्षक जखमी झाल्या. सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावात ही घटना घडली आहे. माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक आणि त्यांचे पती यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाचा : नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर धुळ्यात दोन गटांत जोरदार राडा, एका महिलेचा मृत्यू मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. महिला आयोगानेही घेतली दखल साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी एका महिला वनरक्षकास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aaditya thackeray, Crime, Satara

पुढील बातम्या