मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेबद्दलच पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड; कोर्टानेही दिला दणका

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेबद्दलच पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड; कोर्टानेही दिला दणका

तरुणाने अनेक डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केलं होतं. त्याने आपल्या प्रोफाइलवर मेन्यू लावला होता. यानुसार तो विविवध व्हिडीओ आणि शोसाठी 500 ते हजार रुपयांपर्यंत चार्ज करीत होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार 28 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या अकाऊंटमध्ये तब्बल 6 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. तो दररोज 3 ते 4000 रुपयांची कमाई करीत होता.

जिल्ह्यात असे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारात वाढ होत असतानाच न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

सातारा, 10 जानेवारी : साताऱ्यातील वाईमध्ये खोटी सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करणे महिलेच्या अंगलट आलं आहे. सदर महिलेविरोधात न्यायालयाने खटला दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. जिल्ह्यात असे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारात वाढ होत असतानाच न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

2019 मध्ये एका महिलेने दोघांवर नोकरीला लावतो असे आमिष दाखवत वाई ते महाबळेश्वरच्या दरम्यान वारंवार गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार वाई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासामध्ये पोलिसांना असे निष्पन्न झाले की या दोघांपैकी एक आरोपी गुन्हा घडल्याच्या दिवशी परदेशात होता तर दुसरा आरोपी पुण्यात असल्याचे समोर आले.

ज्या चारचाकी गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा घडला असे सांगण्यात आले होते ती कार गुन्हा घडण्याच्या आगोदर नांदेडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आले. महिलेने दिलेली तक्रार आणि तपासात समोर आलेल्या सर्व बाबींमध्ये तफावत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात 'ब' नावाने समरी वाई कोर्टात दाखल केली.

त्यानुसार महिलेने दिलेली तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केली असल्याचे कोर्टात सिद्ध झाल्याने वाई कोर्टाने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याप्रमाणे या प्रकरणाचा वाई पोलीस तपास करत आहेत.

First published:

Tags: Satara (City/Town/Village), Satara news