अरेच्या!,पोलिसांनी आरोपीला घातली पिशवी;प्लास्टिकची की कापडी ?

अरेच्या!,पोलिसांनी आरोपीला घातली पिशवी;प्लास्टिकची की कापडी ?

मात्र या पिशवी घालून काढलेल्या फोटो मुळे सातारा पोलीस वादाच्या भोवऱ्यात आले आहेत

  • Share this:

तुषार तपासे,सातारा, 08 जुलै : सातारा स्थानिक गुन्हे अन्वशेष शाखेने केलेल्या कामाचे अनेक वेळा कौतुक झाले आहे मात्र कालपासून या टीमचा एक फोटो सेशन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. साताऱ्यात गांजा विकण्यासाठी आलेल्या एका आरोपीला एलसीबीने शिताफीने पकडले. पण माध्यमांना फोटो देण्यापूर्वी एलसीबी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याच्या तोंडावर काळा बुरखा घालण्याऐवजी गडबडीत 'पिशवी' घातली.ही पिशवी कापडी आहे की प्लास्टिकची यावरून सध्या चर्चा सुरू आहे.

मात्र या पिशवी घालून काढलेल्या फोटो मुळे सातारा पोलीस वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक व्हाॅट्सअॅप ग्रुपवर पोलिसांनी केलेल्या या किश्याचीच चर्चा रंगू लागली आहे.

अशा प्रकारे फोटो सेशन झाल्याने या प्रकरणाकडे जिल्हा पोलीस प्रमुख कसे पाहतात हेच पाहावे लागेल.

हेही वाचा

गांधीजींमुळे इंग्रज निघून गेले,असं नाही-सुमित्रा महाजन

 तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू

 VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

रो'हिट'वादळापुढे इंग्लंडची धुळदाण,भारताने मालिका जिंकली

First published: July 8, 2018, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading