मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जवान शहीद झाल्यानंतर भोंदू बाबाने पत्नी आणि आईला फसवले, लाखो रुपये लुटणारा अटकेत

जवान शहीद झाल्यानंतर भोंदू बाबाने पत्नी आणि आईला फसवले, लाखो रुपये लुटणारा अटकेत

शहिदाच्या पत्नीसह अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शहिदाच्या पत्नीसह अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शहिदाच्या पत्नीसह अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • Published by:  Akshay Shitole
सातारा, 14 मार्च : करणी काढण्याच्या आणि सोन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने शहिदाच्या पत्नीसह अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश शिंदे असं अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे. आरोपी गणेश याने शहीद जवानाची पत्नी आणि आई या दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी गाठून एकमेकांवर करणी केल्याचे सांगत ती काढून देण्यासाठी त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील या भोंदू बाबाने फक्त शहिदाच्याच नव्हे तर दुसऱ्या एका कुटुंबाची मोठी फसवणूक केली आहे. वाई तालुक्यातील कुटुंबाला या भोंदूने तब्बल 21 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पीडित कुटुंबाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतल्यावर हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत वाई पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. त्याची दखल घेत गुन्हे शाखेने समांतर तपास करून 12 तासांत या भोंदू बाबाला गजाआड केले. गणेश शिंदे हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील चांदवडी (पुनर्वसन) येथे राहतो. अघोरी विद्या येत असून करणी काढून देण्याच्या बहाण्याने तो सामान्य नागरिकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक लूट करतो. नोकरी लावणे, सोने दुप्पट करून देणे या बहाण्यानेही त्याने मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील शेकडो जणांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यासाठी केंद्रातील प्रभावशाली मंत्र्यांकडे ओळख असून तुम्हाला सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून अनेकांची गणेश याने फसवणूक केली आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास पीडितांना जीवे मारण्याची धमकी तो देत असे. वाई तालुक्यातील पीडित कुटुंबाला मानसिक आणि शाररिक त्रास सुरू होता. त्यामुळे हे कुटुंब एका व्यक्तीच्या सांगण्यावरून गणेश शिंदे यांच्याकडे गेले. त्याने या पीडितेला अघोरी विधी करण्यास सांगितले. तसेच हा विधी न केल्यास पत्नीला मृत्यू येईल अशी बतावणी केली. विधीच्या बहाण्याने गणेश पीडित कुटुंबियांच्या घरी गेला. त्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र घेऊन त्याने सर्व घराची माहिती गोळा केली. या माहितीचा आधार घेत गणेशने घरातील प्रत्येकाला दुसऱ्या सदस्याचा मृत्यू होईल, त्यामुळे विधी करणे आवश्यक आहे असे सांगण्यास सुरवात केली. तसेच या कुटुंबातील दुसऱ्या नवविवाहित जोडप्यातील पतीलाही तुझ्या पत्नीचा मृत्यू होईल, तसेच तुझ्या होणाऱ्या अपत्याचा जन्माआधी मृत्यू होईल अशी भीती दाखवली. या नवविवाहित जोडप्यातील पत्नीला तुमचा पती सहा महिन्यांमध्ये जोगत्या होईल. तुमच्या पुढील सात पिढ्याही तृतीयपंथीय म्हणून जन्माला येतील, अशी भीती दाखवली. त्यामुळे हे कुटुंबीय घाबरले. याचाच फायदा घेत आरोपी गणेश शिंदे याने सदर कुटुंबाकडून लाखो रुपये उकळले. मात्र अंनिसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, नितीन हांडे, वाई शाखेचे रणवीर गायकवाड, अतुल पाटील, दिलीप डोंबिवलीकर, तसेच अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, सातारा अंनिसचे भगवान रणदिवे, डॉ. हमीद दाभोळकर यांनी विशेष लक्ष घालत केलेल्या मागणीनंतर आरोपीवर कारवाई करण्यात आली. हेही वाचा- पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या तरुणीचा पतीकडून खून, स्वत:ही केली आत्महत्या दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. या व्यक्तीकडून फसवणूक झाली असल्यास लोकांनी पुढे यावे आणि गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणात आम्ही आरोपीवर कडक कारवाई करू, असं सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं आहे.
First published:

Tags: Satara news

पुढील बातम्या