मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara News : उदयनराजेंनी कोरोनाचा नीट अभ्यास करावा, गृहराज्यमंत्र्यांनी लगावला टोला

Satara News : उदयनराजेंनी कोरोनाचा नीट अभ्यास करावा, गृहराज्यमंत्र्यांनी लगावला टोला

उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच व्यापाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सांगत अगदी थेटपणे त्यांची भूमिका मांडली होती.

उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच व्यापाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सांगत अगदी थेटपणे त्यांची भूमिका मांडली होती.

उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच व्यापाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सांगत अगदी थेटपणे त्यांची भूमिका मांडली होती.

सातारा, 10 एप्रिल : राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असल्यामुळे लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याची चिन्ह आहे. तर साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी भिक मांगो आंदोलन केले होते. पण, उदयनराजे यांनी भीक मांगो आंदोलन करण्यापेक्षा परिस्थितीचा अभ्यास करावा, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी लगावला.

साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाच्या विरोधात आज सकाळी भीक मांगो आंदोलन करून एकच खळबळ उडवून दिली होती.  गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई चांगलेच संतापले आहेत.

IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलवरून RCB आणि पंजाब किंग्स सोशल मीडियावर भिडले

उदयनराजे भोसले यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या परिस्थितीचा अभ्यास करण्याची गरज असून राज्य शासनाने हा लॉकडाऊन आनंदाने केलेला नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे, असा सल्लावजा टोला शंभूराजे देसाई यांनी उदयनराजेंना लगावला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस भीषण अपघात, नियंत्रण सुटले अन् ट्रक डोंगरावर आदळला, 2 ठार

'अशा पद्धतीचे रस्त्यावर उतरायचं भीक मांगो आंदोलन करायचं हे योग्य नसल्याचं सांगत शंभूराज देसाई यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. आता यावर पुढे उदयनराजे काय भूमिका घेणार हेच पाहावे लागणार आहे.

व्यापाऱ्यांवर भीक मागायची वेळ येईल -उदयनराजे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला सातारा जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसूम होतं. मात्र, या लॉकडाउनला आज सकाळी उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन भीक मागो आंदोलन करत त्यांनी निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलकी कारभाराचाही निषेध व्यक्त केला. उदयनराजे यांनी यावेळी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवरून राज्य सरकारवर टीका केली.

एकतर्फी प्रेमातून भारतीय तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, 400 किमी दूर पुरला मृतदेह

उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारीच व्यापाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं सांगत अगदी थेटपणे त्यांची भूमिका मांडली होती. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली तर खायचं काय असा सवाल करत त्यांनी लॉकडाऊनला स्पष्टपणे विरोध केला. त्यानंतर शनिवारी त्यांनी व्यापाऱ्यांसह थेट आंदोलनातच सहभाग घेत लॉकडाऊनला विरोध केला आहे. साताऱ्याच्या पोवईनाका याठिकाणी फुटपाथवर आंदोलन केलं आहे. अशा प्रकारचे निर्बंध लावले तर व्यापाऱ्यांवर भीक मागायची वेळ येईल, असं सांगत उदयनराजे यांनी याठिकाणी आंदोलन केलं.

First published:

Tags: सातारा