साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू

साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू

तर कळंबे गावातील मंदिराच्या शिखरावर वीज पडल्यामुळे मंदिराचे नुकसान झाले आहे.

  • Share this:

सातारा, 03 मे : राज्यावर कोरोनाचे संकट असताना आता अस्मानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. रविवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसात खंडाळा आणि माण तालुक्यात वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन ठिकाणी वीज पडन मंदिर आणि घराचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी झालेल्या पावसामुळे लोकांची एकच त्रेधातिरपट उडाली. खंडाळा आणि माण तालुक्यात एका महिलेसह तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

'आता त्याची बोलती बंद करणार' शतकानंतर माजी कॅप्टनबद्दल बटलरची प्रतिक्रिया

तर सातारा शहरातील प्रतापगंजपेठेत एका घराच्या टेरेसवर वीज कोसळली. वीज कोसळल्यामुळे भिंतीला भलेमोठे भगदाड पडले आहे. तर कळंबे गावातील मंदिराच्या शिखरावर वीज पडल्यामुळे मंदिराचे नुकसान झाले आहे.

राज्यात एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू

दरम्यान, रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात राज्यात 7 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर 5 जनावरेही दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोरोना काळात लग्न करणं जोडप्याला पडलं महागात, पोलिंसांनी आणलं शुभकार्यात विघ्न

बीड जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस सुरू असतानाच वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. बीड तालुक्यातील गर्भवती महिलेसह केज तालुक्यातील अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. तर, अंबाजोगाईत आणि बीडच्या सानपवाडीतील पाच जनावरे मृत्युमूखी पडले.

परभणी दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

परभणी जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसात वीज कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. परभणी तालुक्यातील ठोला शिवारात दोन अल्पवयीन मेंढपाळांचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल आव्हाड (12 वर्षे) आणि वैभव दुगणे (11 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत.

औरंगाबादमध्ये दोघांचा मृत्यू

औरंगाबादमध्येही मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातलं. वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जालन्यात शेतकऱ्याचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून बदनापूर तालुक्यातील नजीकपंगरी येथील एका शेतकऱ्याचं दुर्दैवी मृत्यू झाला. राधाकिसन जिजा वाघ असं या मयत शेतकऱ्याचं नाव असून पाऊस सुरू झाल्याने शेतातील कांद्यावर ताडपत्री टाकत असताना वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Published by: sachin Salve
First published: May 3, 2021, 9:33 AM IST
Tags: satara

ताज्या बातम्या