पृथ्वीराज चव्हाण आज उदयनराजेंविरोधात दंड थोपटणार? साताऱ्यात काँग्रेसचा मेळावा

पृथ्वीराज चव्हाण आज उदयनराजेंविरोधात दंड थोपटणार? साताऱ्यात काँग्रेसचा मेळावा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कराडमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, सातारा, 29 सप्टेंबर : सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्यभर चर्चेत आहे. कारण विधानसभेसोबतच ही निवडणूक होणार असली तरी उदयनराजे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार त्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यातच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कराडमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होत असून चव्हाण यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत असतानाच आज नेमकं कार्यकर्ते काय भूमिका घेतात आणि कार्यकर्त्यांची काय मत आहेत हे पृथ्वीराज चव्हाण जाणून घेणार आहेत. या मेळाव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली आहे.

उदयनराजे साताऱ्याचा गड कसा राखणार?

निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसंच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर आहे.

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या उदयनराजेंसाठी यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक समजली जात आहे. कारण 2014 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचं मताधिक्य कमालीचं घटलं आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या नरेंद्र पाटील यांनी यावेळी उदयनराजेंची चांगलीच दमछाक केली. उदयनराजेंनी विजय मिळवला खरा पण मताधिक्य मोठ्या प्रमाणात झालेली घट ही त्यांच्यासाठी धक्कादायक होती. म्हणूनच विजयानंतरही त्यांनी 'मताधिक्य कमी होणं हा एकप्रकारे माझा पराभवच आहे' असं विधान केलं होतं.

VIDEO: राजकारणापासून ते देशभरातील घडामोडींपर्यंत बातम्यांचा झटपट आढावा

Published by: Akshay Shitole
First published: September 29, 2019, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading