'हा माझा पराभवच', उदयनराजे साताऱ्याचा गड कसा राखणार?

'हा माझा पराभवच', उदयनराजे साताऱ्याचा गड कसा राखणार?

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसंच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव पोटनिवडणुकीसाठी आघाडीवर आहे.

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या उदयनराजेंसाठी यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक समजली जात आहे. कारण 2014 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचं मताधिक्य कमालीचं घटलं आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या नरेंद्र पाटील यांनी यावेळी उदयनराजेंची चांगलीच दमछाक केली. उदयनराजेंनी विजय मिळवला खरा पण मताधिक्य मोठ्या प्रमाणात झालेली घट ही त्यांच्यासाठी धक्कादायक होती. म्हणूनच विजयानंतरही त्यांनी 'मताधिक्य कमी होणं हा एकप्रकारे माझा पराभवच आहे' असं विधान केलं होतं.

दुसरीकडे, 'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या. एकंदरीतच तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या उदयनराजेंना यंदा आपला साताऱ्याचा गड राखणं आव्हानात्मक ठरणार आहे.

अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2019, 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading