साताऱ्याच्या निकालावर उदयनराजे झाले भावुक!

साताऱ्याच्या निकालावर उदयनराजे झाले भावुक!

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पिछाडीवर टाकून निर्णायक आघाडी घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : राज्यात लोकसभेनंतर राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळाली होती. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. यामुळे अनेक राजकीय गणितं बदलली. साताऱा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला होता. यामुळे साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणूक लागली होती. साताऱ्यात उदयनराजे जवळपास 90 हजार मतांनी पिछाडीवर असून राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

पोटनिवडणुकीत पिछाडीवर पडल्यानंतर उदयनराजे एका वृत्तवाहिनीशी बोलले. त्यावेळी ते भावूक झालेले बघायला मिळाले. उदयनराजे म्हणाले की, लोकशाहीत समाज हाच राजा असतो. त्यांनाच केंद्रबिंदू मानून मी आजवर वाटचाल केली आहे. ते म्हणतील तिच पूर्व दिशा असेल”, असं उदयनराजे म्हणाले. “मला चांगलं काय करायचं तेच करणार… मी चुकीचा निर्णय घेतला तर… मी जिंकून नाय येत तर पराभव होणार…मी २०-३०-२५ वर्षे घालवली, निस्वार्थपणे लोकांची सेवा केली. इथून पुढे गप्प बसणार... एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलंय. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील पाच वर्षे विकास थांबेल.”असं उदयनराजे म्हणाले.

वाचा : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच 'भाजप'ला धक्का, विदर्भानं बिघडवलं गणित!

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केला होता. यात शिवेंद्रसिह हे विधानसभा निवडणूक लढवत होते. तर उदयनराजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानं इथं लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती.

LIVE VIDEO : शरद पवारांनी उदयनराजेंना घेतलं फैलावर, म्हणाले...

अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांची साताऱ्यातील सभा वादळी ठरली होती. लोकसभेला चूक केली आता ती सुधारत आहे असं म्हणत शरद पवार यांनी भावनिक साद घातली होती. विधानसभेसाठी शिवेंद्रराजेंविरुद्ध राष्ट्रवादीने दीपक पवार यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला असला तरी साताऱ्यातील जनता राजघराण्याच्या पाठिशी राहिल्याने काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक जड जाणार असं म्हटलं जात होतं. मात्र श्रीनिवास पाटील यांनी मोठी निर्णायक आघाडी घेतली आहे.

जाणून घ्या पंकजा मुंडेंच्या पराभवाची 7 कारणे!

LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

Published by: Suraj Yadav
First published: October 24, 2019, 2:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading