सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात माजी मुख्यमंत्री उतरणार मैदानात?

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात माजी मुख्यमंत्री उतरणार मैदानात?

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे.

  • Share this:

सातारा, 14 सप्टेंबर : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणूक लढवण्यासाठी आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीला रामराम ठोकत उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. नवी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात दाखल झाले आहे.  शुक्रवारी संध्याकाळी उदयनराजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नवी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर आता उदयनराजेंना पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीसोबत सातारा पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.  उदयनराजे यांच्या विरोधात आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची मनधरणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याआधी श्रीनिवास यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती.

'राजा गेला तरी प्रजा आमच्यासोबत'

दरम्यान, उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कमळ हाती घेतलंय खरं पण आता त्यांच्यावर राष्ट्रवादीतून टीकाही होत आहे.  साताऱ्याची पोटनिवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास नवाब मलिकांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे राजा गेला तरी प्रजा आमच्यासोबत आहे, एक गेला तर दुसरा उमेदवार आमच्याकडे तयार आहे असं म्हणत भुजबळांनी राजेंना टोला लगावला.

स्वकीयांशी संघर्ष करावा लागला हे दुर्दैव होतं - उदयनराजे

उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कुणाचंही नाव न घेता टीका केली आहे. आधी उमेदवारी द्यायची आणि अडवणूकही करायची, यामुळेच अनेक जण पक्ष सोडूव जातायत असं उदयनराजे भोसले म्हणाले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी ही टीका केली. तर स्वकीयांशी संघर्ष करावा लागला हे दुर्दैव होतं, असंही ते म्हणाले.

=================

VIDEO : भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 05:49 PM IST

ताज्या बातम्या