सातारा, 22 जुलै : कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान आज दुपारी (दि. 22) 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. (Satara Koyna Earthquake)
व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. 22) रोजी दुपारी १ वाजता कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरे बसले. हा भूकंप 3 रिष्टर स्केल इतका क्षमतेचा होता. हा भूकंप संपूर्ण कोयना परिसरात जाणवला आहे. या भूकंपाची खोली 9 किलोमीटर इतकी होती. तर या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैरूत्तेस 7 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : विरोधकांच्या मिशन 2024 ला धक्का? शरद पवारांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला ममतांचा विरोध!
या भूकंपापासून कोयना धरणास कोणता धोका नसून या भूकंपाने परिसरात प्रथम दर्शनी कोणतीही वित्त वा जीवित हानी झाली नसल्याचे कोयना व्यवस्थापन विभागाच्या उपकरण उप कळविण्यात आले आहे.
गेल्या पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याची आवक लक्षात कोयना धरणाच्या पायता विद्युत ग्रहातून 1050 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आली असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.
कोयनानगर - पाटण - नवजा आदी परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आतापर्यंत कोयना धरणात 40.63 टीएमसी, पाणी साठा झाला आहे. धरणात पाणी आवक 49525 क्युसेक अशी आहे.
हे ही वाचा : 'एकच चूक झाली, पण ती आम्ही कधीच सुधारणार नाही' नाशकात कोणत्या चुकीबद्दल बोलले आदित्य ठाकरे?
जिल्ह्यात यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. त्याचबरोबर जून महिन्याच्या उत्तर्राधापर्यंत पावसाची उघडझाप सुरू होती. परिणामी खरीप हंगामातील पेरणी होणार का,धरणसाठा वाढणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण जुलै महिना उजाडताच जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने धो-धो बरसण्यास सुरुवात केली. सलग पंधरा दिवस कास,नवजा, बामणोली, कोयना, महाबळेश्वर, तापोळा, प्रतापगड या भागात धुवाधार पाऊस पडत होता. त्यामुळे लोकांना सूर्यदर्शन झाले नाही. गेल्या बारा दिवसात तर सतत पाऊस 100 मिमीच्यावर झाला. यामुळे ओढे, नाले खळखळून वाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, Satara, Satara (City/Town/Village), Satara news