धनाकडे पाठ फिरवणाऱ्या धनाजी काकांची कहाणी...

प्रतिकूल परिस्थितीपुढे गुडघे टेकत वाम मार्गाला जाणारे अनेक आहेत. मात्र पैशांच्या श्रीमंतीपुढे प्रामाणिकपणाचे महामेरु उभे करणारे धनाजींसारखे खरे धनवान बोटावर मोजण्या इतकेच आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 11:53 AM IST

धनाकडे पाठ फिरवणाऱ्या धनाजी काकांची कहाणी...

किरण मोहिते (प्रतिनिधी)सातारा , 30 ऑक्टोबर: प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट आपल्या अनेक पिढ्यांच्या जडणघडणीतला मैलाचा दगड ठरली आहे. मात्र या पुस्तकी ज्ञानाला साताऱ्याच्या माणमधल्या धनाजी जगदाळेंनी मूर्त स्वरुप दिलं. परिस्थितीला शरण जाऊन वाईट मार्गानं जाणारे आपण अनेक जण पाहिले असतील. पैशासाठी रक्ताच्या नात्यामध्येही वाद होताना पाहिले असतील. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका धनाजीची कहाणी सांगणार आहोत ज्यानं पैशाचं नाही तर प्रामाणिकपणाचं धन आयुष्यभर जपलं आहे.

दहीवडीच्या बाजारासाठी गेलेल्या धनाजींची अचानक बस चुकली. पुढच्या बसनं घरी येण्यासाठी धनाजींकडे 7 रुपयेही नव्हते. परिस्थितीमुळे हताश झालेले धनाजी बसस्थानकात झोपून होते. त्याचवेळी काळ्याकुट्ट अंधारात त्यांच्यासमोर साक्षत लक्ष्मी प्रकटली. 40 हजारांचा बंडल धनाजींसमोर चक्क कुबेराचा खजिना बनून समोर उभा होता. मात्र धनाजींच्या प्रामाणिकपणाची उंची पैशांच्या इमल्यांसमोर वरचढ ठरली. पत्नीच्या ऑपरेशनासाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाच्या हातून 40 हजारांची रक्कम गहाळ झाली होती. या तरुणाची बस स्थानकात पैसे शोधण्यासाठी कसरत सुरू होती. ते धनाजी काकांनी पाहिलं आणि त्याच्याकडे चौकशी केली. खात्री होताच धनाजींनी त्याच्यासमोर नोटांचं जसच्या तसं बंडलं तरुणाच्या हातात ठेवलं.

धनाजींचा प्रामाणिकपणा पाहून तरुणानं त्यांना हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ केले. मात्र धनाजींनी 40 हजारातले अवघे 7 रुपये आपल्या प्रवास खर्चासाठी मागून घेतले. नियतीनं धनाजींवर अनेक जीवघेणे घाव घातले. मुलगा आणि पत्नीला निष्ठूर काळानं कायमचे हिरावून घेतलं. अखेर शेतमजुरी करत धनाजींनी आपला उदारनिर्वाह चालू ठेवला. परिस्थितीला कधी शरण गेले नाहीत. प्रतिकूल परिस्थितीपुढे गुडघे टेकत वाम मार्गाला जाणारे आजच्या जगात अनेक भेटलीत. मात्र पैशांच्या श्रीमंतीपुढे प्रामाणिकपणाचे महामेरु उभे करणारे धनाजींसारखे खरे धनवान म्हणजे अंधारात प्रकाशाचा चुकार किरण सापडण्यासारखं आहे.

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: satara
First Published: Oct 30, 2019 08:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...