मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: साताऱ्यात मुसळधार पाऊस; कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयात पाणी शिरले, प्रशासनाची तारांबळ

VIDEO: साताऱ्यात मुसळधार पाऊस; कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयात पाणी शिरले, प्रशासनाची तारांबळ

Heavy rain in Satara: साताऱ्यात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे एका रुग्णालयातही पाणी शिरले.

Heavy rain in Satara: साताऱ्यात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे एका रुग्णालयातही पाणी शिरले.

Heavy rain in Satara: साताऱ्यात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे एका रुग्णालयातही पाणी शिरले.

सातारा, 1 जून: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy rain) पडत आहे. मुसळधार पावसामुळे कुठे झाडांची पडझड (tree fell down) होत आहे तर कुठे बागायतदारांचे नुकसान होत आहे. साताऱ्यातही आज दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाउसाने हजेरी लावली असुन गेल्या दीड तासापासून जोरदार पाऊस झाला. कराडमधील रुग्णालयात पाणी शिरल्याचं पहायला मिळालं.

कराड मलकापूर परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे कराड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस एवढा मोठा होता कि ज्या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार सुरु असलेल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये देखील पाणी शिरल्यानं हॉस्पिटल प्रशासनाची तारांबळ उडाली होती. रुग्णालयाच्या तळघरात पाणी शिरल्याने त्याचा परिणाम रुग्ण असलेल्या वॉर्डात झालेला नाहीये. मात्र, रुग्णालयात पाणी शिरल्याने एकच तारांबाळ उडाली होती.

अहमदनगरमध्ये लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात; मात्र आरोग्य विभागाने केला अजब खुलासा

वसईतही मुसळधार पाऊस

वसई तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी संध्याकाळपासून शहरी तसेच ग्रामीण भागात पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली. पावसाचा वेग इतका होता अवघ्या काही तासातच पावसाच्या जोरदार सरींनी शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिकेचे नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे दिसून आले.

अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती तर दुसरीकडे अनेक भागात वीटभट्ट्या आणि सुक्या मासळीवर पाणी पडल्याने नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.

First published:
top videos

    Tags: Rain, Satara