उदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक

उदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक

  • Share this:

विकास भोसले, सातारा, 23 सप्टेंबर :  साता-यात डाॅ ल्बी वाजणारच अशी गर्जना करुन थेट न्यायालयाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आवाहनाला सातारकरांनीच कोलदांडा दिला असून सर्व सार्वजनिक गणेश मंडळानी न्यायालयाचा आणि पोलीस प्रशासनाचा आदेशाचे तंतोतंत पालन करुन पारंपारीक वादयातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरु केलीय.

सातारा,कराड,वाई,फलटण,कोरेगाव, महाबळेश्वर, म्हसवड या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून पारंपारीक ढोल, ताशाचा गजरात या मिरवणुकांना सुरुवात झाली.

दरम्यान उदयनराजे यानी गेल्या १५ दिवसापासून आक्रमक भूमिका घेतल्याने सातारा पोलिसांनी डाॅल्बी मालकांना नोटीसा दिल्या आहेत तर सातारा शहर पोलिसांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे गटाच्या सुरुची राडा प्रकरणातील ६० कार्यकर्त्यांना २ दिवस कलम १४४ प्रमाणे सातारा तालुका बंदी केली आहे.

उदयनराजेंचा इशारा

डेसिबलची मर्यादा घालून डॉल्बीला मंजुरी द्यायला हवी. इथं तरुणांना रोजगार मिळत नाही. काही तरूण हे कसेबसे कर्ज काढून डॅाल्बी घेतलाय. आता त्यांच्यावर जप्ती आलीय याला जबाबदार कोण? त्या पोरांनी कर्ज कसं फेडायचं ?, असा सवाल राजेंनी उपस्थितीत केला.

मला अटक करायचे सोडून दया, मी जनतेसाठी काहीही करू शकतो. डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय?, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का ? असा सवालच राजेंनी नांगरे पाटलांना विचारलाय. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा राजेंनी दिला,

तसंच सातारा गणेश विसर्जन मंगळवार तळे येथेच होणार आहे. या बाबत कारण नसताना प्रसासनाने गोधळ घातलाय.

तळ्याच्या बाबतीत काहीही शंका बाळगू नका मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही खा.उदयनराजेंची पुन्हा एकदा प्रशासनाला दिलाय.

डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय?, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का ? असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. तसंच मंगळवार तळे माझ्या मालकीचे तिथे काय करायचे काय नाही ते मी ठरवणार कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला.

संघर्ष नको -नांगरे पाटील

लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो अशा शब्दात नांगरे पाटलांनी स्पष्ट केलंय.

गणपती मिरवणुकीत रात्रीच्या वेळीही डॉल्बी वाजवण्यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी न्यायालय आणि पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान देत डीजे लावणारच असल्याचा सज्जड दम भरलाय. आता पोलीस प्रशासनही डीजेवर कारवाई करण्याबाबत ठाम असल्याचे संकेत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेत.

लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो. त्यामुळे डीजेबाबत आम्ही पहिल्यांदा जागृती, शिक्षण आणि नंतर अंमलबजावणी या टप्प्याने आम्ही काम करतोय. पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सुप्रीम आणि हायकोर्टाचे आदेश आहेत. त्यात पाच वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे अशी आठवण नांगरे पाटलांनी करून दिली.

मी स्वतः गणेशभक्त आहे. त्यामुळे कोणत्याही गणेश भक्तावर कारवाई करण्याची आमची इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

===================================

अंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी

First published: September 23, 2018, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading