सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह किसन वीर कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये ऐनवेळी प्रवेश केला.

  • Share this:

सातारा, 09 मार्च: सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह किसन वीर कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये ऐनवेळी प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या काँग्रेसवर मोठा वज्राघात झाला आहे. प्रवेश झाल्या नंतर समोर असलेल्या कार्यकर्ते, समर्थक यांनी जल्लोष केला.

मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. कार्यकर्त्यांनी मदन यांनी भाजपमध्ये जावे असाच सूर धरला. त्यानंतर किसन वीर कारखान्याच्या तिसर्‍या डिस्टीलरीच्या उद्घाटनाचे निमित्त साधत मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित कार्यक्रमाला यावे, असा भोसले यांचा आग्रह होता. त्यानुसार किसन वीर कारखान्याच्या कार्यस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किसन वीर कारखान्याच्या तिसर्‍या डिस्टीलरीचे पूजन झाले.

मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात वातावरण कमालीचे तापले आहे. एकेकाळी सातारा जिल्हा काँग्रेसची धुरा समर्थपणे सांभाळणार्‍या भोसले यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसवर मोठा वज्राघात होणार आहे. अगोदरच गटा-तटात विखुरलेली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीपुढे हैराण झालेली राष्ट्रीय काँग्रेस भोसले यांच्या भाजपमध्ये जाण्याने आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेही बदलणार असून भाजपला वक्तृत्वात पारंगत असलेला, जनाधार असलेला व कामाचा प्रचंड डोंगर उभा केलेला वजनदार नेता मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

उंदराने चोरले कोट्यवधींचे हिरे, CCTV VIDEO व्हायरल

First published: March 9, 2019, 4:21 PM IST
Tags: satara

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading