सातारा, 20 फेब्रुवारी: पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान ठार झाले होते. या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील एक पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
वाचा-उद्धव ठाकरेंनी सांगितलं भाजपसोबत पुन्हा युती करण्यामागचं खरं कारण!
काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे आम्ही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी, कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे शुभेच्छा फलक सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कोठेही लावू नयेत. तसेच आम्हाला वाढदिवसानिमित्त हार-पुष्पगुच्छा आदी भेट देवू नयेत, असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
जवानांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे
पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला आहे याची कल्पना न केलेली बरी, आज देश एका विशिष्ट वळणावर येवून ठेवला आहे. भारतीय जवान असे वीरमरण केवळ देशाच्या सीमा अभेद्य ठेवण्यासाठी स्विकारत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाने जवानांच्या पाठीशी उबे राहिले पाहिजे. वाढदिवसाचे औचिच्य आम्हाला फार आहे असे नाही. वाढदिवस येतील आणि जातील, तथापि आजच्या घडीला जवानांच्या दुख:त सहभागी होता यावे या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कोणीही कार्यकर्त्याने शुभेच्छा फलक कोठेही लावू नयेत किंवा पुष्पगुच्छ, हार तुरे भेट देऊ नये. अशा शुभेच्छा स्विकारल्या जाणार नाहीत असे उदयनराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.
VIDEO : युतीनंतर सोमय्यांविरोधातील आक्रमक शिवसैनिक थेट मातोश्रीवर, उद्धव ठाकरे म्हणतात...