विधानसभेनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्याला धक्का, तालुक्यातील पहिले 3 निकाल विरोधात

विधानसभेनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्याला धक्का, तालुक्यातील पहिले 3 निकाल विरोधात

ग्रामपंचायत निवडणुकीतील सुरुवातीच्या काही निकालांनीही शशिकांत शिंदे यांची निराशा केली आहे.

  • Share this:

सातारा, 18 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल स्थानिक पातळीवर नेत्यांसाठी महत्त्वाचे असतात. म्हणूनच राज्य स्तरावरील नेतेही या निवडणुका प्रतिष्ठेच्या करतात. राष्ट्रवादीचे साताऱ्यातील दिग्गज नेते शशिकांत शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतील सुरुवातीच्या काही निकालांनीही शशिकांत शिंदे यांची निराशा केली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मंगळापूर, पेठ कीन्हई व कठापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना धक्का देत आमदार महेश शिंदे गटाने सत्ता स्थापने केली आहे.

मंगळापूरमध्ये महेश शिंदे गटास 7 तर शशिकांत शिंदे गटास 0 जागा मिळाल्या, जागा पेठ कीन्हईमध्ये आ.महेश शिंदे गटास 5 तर शशिकांत शिंदे गटास 4 जागा, कठापूरमध्येही महेश शिंदे गटास 5 तर शशिकांत शिंदे गटास 4 जागा मिळाल्या आहेत.

दुसरीकडे, कराडमध्ये मात्र राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे. कारण कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी झालं आहे.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने विरोधकांचा 8-1 ने धुव्वा उडवला आहे. साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साताऱ्यातील इतर ग्रामपंचायतींचा निकाल काय लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार असून इतर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: January 18, 2021, 10:05 AM IST

ताज्या बातम्या