सातारा, 23 जुलै : सातारा शहरात धक्कादायक घटनासमोर आली आहे. युवकाचे हातपाय बांधून फासावर लटकवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सातारा शहर हादरले आहे. (Satara Crime) दरम्यान ही घटना सातारा शहरातील तालीम संघ मैदान परिसरात घडली आहे. संदीप मच्छिद्र दबडे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना कोणत्या कारणावरून करण्यात आली या घटनेमागे कोण आहे याचा अद्यापही तपास लागू शकला नाही. दरम्यान या घटनेने वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचत तपास करत आहेत.
खूनाच्या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संदीप हा 30 वर्षांचा होता. त्याचा खून करून घरातील तुळईला त्याचा मृतदेह लटकवला होता. संदीप मच्छिंद्र दबडे (वय ३० रा. दुर्गा पेठ सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनाचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हे ही वाचा : 'दुःख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला पण..'; मुख्यमंत्रिपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा
संदीप दबडे या तरुणाचे खून करून त्याचा मृतदेह घरातील तुळईला लटकवल्याची घटना उघडकीस आली. तोंड, हात, पाय बांधलेल्या अवस्थेत संदीप मृतदेह आढळून आला आहे. घरातच मृतदेह आढळल्याने नेमका खून कोणी आणि कोणत्या कारणातून केला याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपास सुरु केला आहे.
सातारा जिल्ह्यात एका आठवड्यात दुसरी घटना
पाटण तालुक्यातील करपेवाडीत 16 वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेत सातारा पोलिसांनी दोन मांत्रिक आणि त्या दुर्दैवी मुलीच्या आजीला तीन वर्षानंतर अटक केली असून या खूनाचा उलगडा झाला आहे. चौकशीमध्ये गुप्तधनासाठी आजीनेच आपल्या नातीचा हा नरबळी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : Kolhapur Crime : कोल्हापुरातील युवकाने 13 चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याचा VIDEO; विचित्र कारण समोर
22 जानेवारी 2019 रोजी करपेवाडी येथे ही हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले असून अजून काही आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात सुरवातीला पोलिसांचा संशय मुलीच्या आई-वडीलांवर होता. मात्र, तपास सुरु असताना काही संशयीत पुरावे मिळाल्यानंतर ही हत्या आजीने गुप्तधनाच्या हव्यासापोटी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Police, Satara, Satara (City/Town/Village), Satara news