मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara Crime : मित्राच्या साथीने पैसे डबल करायच्या नादात सगळचं गमावला अन् नुकसान भरपाईसाठी चोरला 18 लाखांचे दागिने

Satara Crime : मित्राच्या साथीने पैसे डबल करायच्या नादात सगळचं गमावला अन् नुकसान भरपाईसाठी चोरला 18 लाखांचे दागिने

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने ३५ तोळ्यांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने ३५ तोळ्यांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने ३५ तोळ्यांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

मुंबई, 17 जुलै : सध्या शेअर मार्केटमध्ये डबल पैसे करून देण्याच्या अमिशामुळे राज्यातील हजारे नागरिक जाळ्यात अडकत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात याचा जोरदार प्रचार सुरू आहे. पैसे डबल करून देण्याच्या नादात काही लोकांनी शेती गहानवट ठेवली आहे तर काहींनी लोन काढून पैसे लावले आहेत. परंतु काही काळाने आपली फसवणूक झाली आहे हे कालांतराने समजल्यावर त्यांच्यावर मोठे संकट येऊन ठेपते. सातारा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने ३५ तोळ्यांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (Satara Crime)

कातरखटाव येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीतील संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान ही चोरी घरातीलच मुलानेच केल्याची माहिती समोर आली आहे. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने ३५ तोळ्यांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन तासाच्या आतच या चोरीचा भांडा फोड केला. तेजस तानाजी देशमुख (वय 20, रा. कातरखटाव, ता. खटाव) असे संशयिताचे नाव आहे.

हे ही वाचा : चक्रीवादळाची दिशा बदलली, कोकण वगळता राज्यात पाऊस थांबणार

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कातरखटाव येथील तानाजी देशमुख यांच्या विठ्ठल मंदिराजवळील केशव निवास या घरातून शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास भरदिवसा तब्बल 35 तोळे सोन्यासह चांदीचा ऐवज व 30 हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते.

घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकही तैनात करण्यात आले होते. या चोरीत चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहीले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत घरातील लोकांची चौकशी व जबाब घेतल्यानंतर या प्रकरणात घरातील कोणाचा तरी हात असल्याचा संशय त्यांना येऊ लागला. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर यांनी फिर्यादीचा मुलगा तेजस याला अधिक चौकशीसाठी मायणी पोलीस दूरक्षेत्रात नेले. त्यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

हे ही वाचा : अनुस्कुरा घाटात पुन्हा कोसळली दरड, पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ही चोरी केल्याचे मान्य केले. एका मित्राच्या साथीने त्याने शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामध्ये आलेल्या आर्थिक नुकसानीमुळेच तेजसने ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आणखी एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे

First published:

Tags: Satara, Satara (City/Town/Village), Satara news, Share market